शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पालिकेच्या उद्यान अधीक्षकानेच बांधकाम विभाग व नगरसेवकाचे साटेलोटे असल्याचा प्रश्न उपस्थित केल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:05 PM

Mira Bhayander Municipal Corporation News : मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागातील अनागोंदी वर नेहमीच आरोप व तक्रारींचा फेरा लागला असताना आता....

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागातील अनागोंदी वर नेहमीच आरोप व तक्रारींचा फेरा लागला असताना आता पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यानेच बांधकाम विभाग व एका नगरसेवकाचे संगनमत असल्याचा मुद्दा आयुक्त, उपायुक्त आदींना दिलेल्या खुलाशात उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे . इतकेच नव्हे तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गेल्या १५ वर्षां पासून एकाच पदावर असल्याचे म्हटले आहे .पेणकरपाडा येथील खोडियार चाळ व खाडी पात्र ओलांडून दहिसरच्या एन एल कॉम्प्लेक्स येथील रस्त्या साठी चक्क खाडीपात्रात पाईप व भर टाकून रस्ता बांधण्याचा प्रताप बांधकाम विभागाने चालवला . विकास आराखड्यात सदर ठिकाणी रस्ता नसताना तसेच पेणकरपाड्यात मोठी वाहतूक कोंडी या रस्त्या मुळे होण्याची शक्यता असल्याने त्याला विरोध झाला . पालिकेने सदर काम थांबवले .दरम्यान सदर काम झाडे काढण्याची कार्यवाही उद्यान विभागाने केली नाही म्हणून काम थांबल्याचा कांगावा सुरु झाला . लोकमतने या बाबतचे वस्तुस्थिती दर्शक वृत्त दिल्या नंतर आता त्याच वृत्ताचा आधार घेत पालिकेचे प्रभारी उपमुख्य उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम यांनी बांधकाम विभाग व तक्रार करणारे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे .येथील दोन झाड हटवण्यासाठी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांच्या सोबत पाहणी करून तसा प्रस्ताव सादर केला आहे . ह्यापुढे बांधकाम विभागाने कामाची आर्थिक व प्रशासकीय मंजुरी तसेच नकाशे मंजूर करतेवेळीच बाधित झाडे काढणे साठी प्रस्ताव सादर करावा . जेणे करून वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही होऊन कामास विलंब होणार नाही असे मेश्राम यांनी सुचवले आहे .सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दीपक खांबित व उप अभियंता यतीन जाधव हे एकाच विभागात १५ वर्षां पासून काम करत आहेत . ध्रुवकिशोर पाटील यांनी केलेल्या तक्रारी वरून सदर अधिकारी लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्याशी कामे वाटप करून संगनमताने उद्यान विभागाच्या विरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे मेश्राम यांनी उपायुक्तांसह संबंधितांना पाठवलेल्या खुलाशात म्हटले आहे .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर