शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागातील नोकरभरतीत गैरव्यवहार

By admin | Updated: November 10, 2015 02:10 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ९४ व्हॉल्व्हमॅनच्या भरतीत गैरव्यवहार झाला असून, पालिकेत हंगामी स्वरूपात सात वर्षे काम करणाऱ्यांना मात्र डावलले आहे

ठाणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील ९४ व्हॉल्व्हमॅनच्या भरतीत गैरव्यवहार झाला असून, पालिकेत हंगामी स्वरूपात सात वर्षे काम करणाऱ्यांना मात्र डावलले आहे. या निवड यादीत एकाच ठेकेदाराच्या चार उमेदवारांचाही ‘समावेश’ झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अनुभवाच्या निकषावर सरळ सेवेने ही पदे भरली आहेत. प्रत्यक्षात ब्रह्मांड जलकुंभावरील संजय पवार, अजय मोरे, भरत वडणे, मोहन मालुसरे आणि गणेश वाशिवले यांच्यासह विजयनगरी जलकुंभावरील बाळाराम पाटील, अनिल तावडे, तुषार खाडे, धनराज पाटील आणि डोंगरीपाडा जलकुंभावरील समीर शेख यांच्यासह अनेक जणांना डावलले आहे. या सर्वांनी २००८ ते २०१५ या कालावधीत या जलकुंभावर ‘व्हॉल्व्हमॅनचे काम करूनही महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि खासगी ठेकेदारांच्या नात्यागोत्यातील व्यक्तींचाच भरणा केला आहे. त्यांना पालिकेच्या सेवेत घेण्यासाठी अनुभवाची बनावट प्रमाणपत्रे तसेच बोगस रजिस्टर बनवून त्यामध्ये काही नावे समाविष्ट केली आहेत. संबंधित उमेदवाराने तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेच्या आस्थापनेवर काम केले आहे की नाही, याची चौकशीही झालेली नाही. महापालिकेच्या जलकुंभावरील कार्यरत कर्मचाऱ्यांची नोंदच महापालिकेकडे नसल्याचे निदर्शनास आले असून अशांची कोणतीही माहिती न घेता अत्यंत घाईघाईने भरती का करण्यात आली? भरती झालेल्या निवड यादीमध्ये डोंगरीपाडा जलकुंभावरील ठेकेदाराचा सहकारी, वाहनचालक आणि दोन नातेवाईक अशा चौघांचा तसेच पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या दोन नातेवाइकांचाही यामध्ये समावेश आहे. अनेकांची अनुभव नसतानाही प्रतीक्षा यादीत नावे आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)