शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

निवडणूक आयोगाचे दरपत्रक : ५० रुपयांचा मिल्कशेक; हार ४0 रुपये, हॉर्लिक्स 30 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 2:18 AM

- सुरेश लोखंडे ठाणे : निवडणुकीचा प्रचार म्हटले म्हणजे कार्यकर्त्यांचे नखरे आले. अगोदर द्या मटण, मग सांगू दाबायला बटण, ...

- सुरेश लोखंडेठाणे : निवडणुकीचा प्रचार म्हटले म्हणजे कार्यकर्त्यांचे नखरे आले. अगोदर द्या मटण, मग सांगू दाबायला बटण, असा पवित्रा कार्यकर्ते घेतात, हे आता निवडणूक आयोगालाही ठाऊक असल्याने आयोगाने निश्चित केलेल्या खाद्यपदार्थांच्या दरपत्रकात मांसाहारी जेवणाकरिता २०० रुपयांपर्यंतचा दर ठरवून दिला आहे. प्रचाराचा शीण घालवण्याकरिता कार्यकर्त्याने मिल्कशेक मागितला, तर ५० रुपयांपर्यंतचा खर्च उमेदवार करू शकतो. मात्र, कार्यकर्त्यांनी हॉर्लिक्स पिण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्याकरिताही ३० रुपये खर्चासह आयोगाने तरतूद करून कार्यकर्त्यांच्या तंदुरुस्तीची काळजी वाहिली आहे.प्रचार म्हटले म्हणजे कार्यकर्त्यांचा भर वडापाव, समोसा आणि चहा-कॉफीवर असतो. त्याकरिता, प्रत्येकी १२ रुपयांपर्यंतचा खर्च वाजवी आहे. वडाउसळ, इडलीसांबर, पोहे, शिरा, चिकन-दोन ब्रेड, बे्रड बटर, ज्युस आदींसाठी प्रत्येकी २५ रुपये खर्च नियमानुसार आहे. मेदूवडा, व्हेज कटलेट, साबुदाणावडा यासाठी प्रत्येकी ३५ रुपये तर अप्पम, उपमा, ढोकळा, रशियन सॅण्डवीच, राइस आदींसाठी २० रुपये मंजूर आहेत. बे्रडबटर, व्हेज सॅण्डवीच यांच्यासाठी १५ रुपये मोजण्यात येतील, तर मिसळपाव, व्हेज करी, ड्राय सब्जी प्रत्येकी ४० रुपये खर्च वाजवी ठरवला आहे. कबाब, कट फ्रूट आदींची किंमत १८ रुपये असल्यास नियमानुसार आहे. आम्लेट सॅण्डवीच, हॉर्लिक्स, कोल्ड कॉफी, दाल, चपाती, स्वीट आदींची किंमत प्रत्येकी ३० रुपये असेल, तर तो खर्च मान्य आहे. नॉनव्हेज करी ७० रुपये, व्हेज करी ६० रुपये, एक पापड, सलाड पाच रुपये. व्हेज करी, चपाती-दाळसाठी ७५ रुपये, यामध्ये अधिक राइस स्वीट, सलाड असल्यास ११० ते १२६ रुपये तर यामधील नॉनव्हेजसाठी २०० रुपये, चिकन खिमा पावसाठी १०० रुपये आणि राइसप्लेटसाठी १०० रुपये मोजणे आयोगाला मान्य आहे.अर्ज दाखल करताना व विजयी मिरवणुकीतील वाजंत्री पथकातील प्रत्येकास ५०० रुपये, तर बॅण्ड पथकाला तीन हजार रुपये मोजणे आयोगाला मान्य आहे. प्रचारसभांच्या ठिकाणी जनरेटरवर प्रत्येक दिवशी पाच हजार रुपये, तर २५ फुटांपेक्षा कमी उंचीच्या कमानीचा प्रतिदिन पाच हजार रुपये खर्चाचा दर निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे.राज ठाकरे यांनी पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, अशी हाळी देण्याचे ठरवले, तर प्रोजेक्टरच्या नगाला २५० रुपये, व्हिडीओ कॅमेरामनला एक हजार, मॉनिटर स्क्रीनला दिवसाला ७५ रुपये, लॅपटॉपसाठी दिवसाला ३५० रुपये दर निश्चित केला आहे. रिक्षाद्वारे प्रचार करताना प्रतिदिन १२५० रुपये खर्चाची मर्यादा आखून दिली आहे.प्रचारसभेकरिता जेव्हा उमेदवार, नेते येतात तेव्हा त्यांना गमजा, मफलर घातले जातात. पक्षप्रवेश करतानाही तेच परिधान केले जातात. त्याचे दर तीन ते साडेआठ रुपये प्रतिनग वाजवी असतील. व्यासपीठावरील उमेदवार, स्टार प्रचारक यांची टोपी साडेतीन ते नऊ रुपये या किमतीची असेल तरच ती नियमानुसार आहे. त्यापेक्षा जास्त रकमेच्या टोप्या परिधान करणे, हा ‘टोपी घालण्याचा’ प्रयत्न ठरू शकतो. प्रचारसभेत हारतुरे देण्याची पद्धत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने हार व फुले महाग असताना मध्यम आकाराच्या फुलांच्या हारासाठी ४० रुपये हा वाजवी दर असल्याने त्या निकषानुसार फुल नव्हे तर पाकळी देणेच शक्य आहे. याचप्रमाणे पुष्पगुच्छ१०० रुपये प्रत्येकी यानुसार प्रतिदिवसाकरिता ३०० रुपये खर्च करणे निवडणूक आयोगाला मान्य आहे. त्यामुळे व्यासपीठावरील डझनभर नेत्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत होत असेल तर तो ‘फूल’ बनवण्याचा प्रयत्न ठरू शकतो, असेच एक प्रकारे आयोगाचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thaneठाणे