शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सोशल मीडिया आणि संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2020 23:46 IST

ठाणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलमध्ये १,०४३ तक्रारी

- जितेंद्र कालेकरठाणे :  सोशल मीडियावर पती-पत्नीचे असलेले लक्ष आणि एकमेकांच्या चारित्र्यावरील संशयाच्या भुतामुळे सुखी संसाराला ग्रहण लागल्याच्या अनेक तक्रारी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेलमध्ये येत आहेत. गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या कारणांच्या एक हजार ४६१ तक्रारी या कक्षाकडे आल्या. त्यातील ५०१ तक्रारींवर या पथकाने समझोता घडवून आणला आहे.लग्नातील मानपानावरून होणारी भांडणे, सासू, सासरे, पती, दीर, नणंद यांच्याकडून माहेरून पैसे आणण्यासाठी होणारा त्रास, पतीचे परस्त्रीबरोबरचे संबंध असल्याचा संशय, पतीचे दारूचे व्यसन, पती चारित्र्यावर संशय घेतो, यातूनच पती-पत्नींमध्ये सतत वाद होतात. या तक्रारी घेऊन महिला पोलीस ठाण्यात येतात. तर, पती व्यसनी आहे अथवा त्याचे परस्त्रीशी ‘संबंध’ आहेत. तो तिकडे खर्च करेल, या भीतीने त्याचा पगारच काही महिला काढून घेतात. अशी प्रकरणे पोलिसात गेल्यानंतर सुरुवातीला साधी अदखलपात्र तक्रार दाखल होते. नंतर आयुक्तालयातील ‘भरोसा’ सेलमध्ये सामाजिक संस्थांद्वारे अशा दाम्पत्यांमध्ये समेट घडवून आणला जातो. जिथे समेट घडवून येत नाही, अशा प्रकरणांमध्ये त्यांना पोलीस ठाण्यात कारवाईसाठी पाठविले जाते. नवरा-बायकोमध्ये होणाऱ्या भांडणाची कारणेचारित्र्यावर संशय घेण्यातून अनेक दाम्पत्यांचे वाद विकोपाला जातात. अनेक घरांमध्ये सासू (पतीची आई) पती-पत्नींमध्ये हस्तक्षेप करतात, तर काही ठिकाणी मुलींची आई या दोघांच्या संसारात ढवळाढवळ करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पत्नीची वेशभूषा व पतीचे व्यसन हाही कळीचा मुद्दा आहे. पत्नीकडूनही छळवणुकीचे प्रकार वाढले, अशी सुमारे ३० टक्के प्रकरणे असल्याची माहिती ‘कॉज फाउंडेशन’च्या कल्पना मोरे यांनी दिली.५०१ प्रकरणांत समेटपती-पत्नींमधील वादाबरोबर बऱ्याच प्रकरणांमध्ये सासू-सुनेचे पटत नाही. एकत्र कुटुंबातून वेगळे व्हायचे असते. अशावेळी दोन्ही बाजूंनी समझोता घडवून आणला जातो. २०१९ मध्ये अशा १,०४३ तक्रारी आल्या. ४३६ प्रकरणांमध्ये समझोता केला. तर २०२० नोव्हेंरपर्यंत ४१८ तक्रारींपैकी ६५ प्रकरणांमध्ये समझोता केल्याचे भरोसा सेलचे सुनील कांबळे म्हणाले.सामाजिक संस्थांच्या मदतीने  पती-पत्नींचे समुपदेशन केले जाते. त्यांच्यात समझोता घडवण्याचा प्रयत्न केला जातो. जर एखाद्या महिलेचा अति छळ किंवा माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत असेल किंवा तिच्या जीवाला धोका असेल, मारहाण होत असेल अशा वेळी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी प्रकरण पाठविले जाते.       - पूनम चव्हाण, भरोसा सेलप्रमुख, ठाणे