शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 वसई कार्यालयामध्ये " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 18:27 IST

Police : कोविड 19 च्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांनी व्हाट्सआप च्या माध्यमातून साधावा संवाद ; पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांचा उपक्रम !

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासनाने कोविड 19  या वाढत्या प्रादुर्भावाचाच्या अनुषंगाने "ब्रेक द चेन "अनव्ये  निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील अशा प्रकारचे माध्यम सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

आशिष राणे  

वसई - मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांलय हद्दीतील वसई विरारच्या पोलीस उप -आयुक्त परिमंडळ 2 मधील वसई कार्यालयामध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्य सुरक्षितता लक्षात घेऊन नागरिकांसाठी  " ई "भेट संवाद सुविधा कार्यान्वित केल्याची माहिती परिमंडळ -2 चे उप-आयुक्त संजयकुमार पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.

कोविड 19 च्या वाढत्या संक्रमणामुळे नागरिकांची काही तक्रार किंवा काही काम असल्यास सोशल मीडियाच्या  व्हाट्सआपच्या माध्यमातून हा संवाद अधिकाऱ्यांशी साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांनी केले आहे. कोविड19 या विषाणूने नागरीक व प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले असून पोलिस विभाग हा या महामारी च्या विरुद्ध उपाय योजना राबवण्यामधील एक महत्त्वाची अग्रभागी अशी संस्था आहे.

आणि कोविड19 च्या या उपाययोजनांचा एक भाग म्हणून शासनाने अनावश्यकपणे फिरणाऱ्या लोकांकरता राज्यात संचारबंदी देखील लागू केली असून सरकारी कार्यालयातील प्रत्यक्ष भेटीस मात्र मनाई केलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याकरता एक माध्यम उपलब्ध करणे गरजेचे आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाने कोविड 19  या वाढत्या प्रादुर्भावाचाच्या अनुषंगाने "ब्रेक द चेन "अनव्ये  निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील अशा प्रकारचे माध्यम सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. त्याचा सारासार विचार करून मीरा भाईंदर वसई विरार  पोलीस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी दि 16 एप्रिल रोजी पोलीस आयुक्तालया मार्फत आदेशपत्र काढले व तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान या पोलीस आयुक्तांच्या पत्रांच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी पोलिस उप-आयुक्त परिमंडळ 2 वसई यांचे समक्ष भेटी ऐवजी ऑनलाइन " ई " भेटद्वारे संवाद साधावा तर यासाठी हा ऑनलाइन संवाद सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 या वेळेत 8669604003 या व्हाट्सअँप द्वारे किंवा व्हिडिओ कॉल द्वारे हा  संवाद साधावा तसेच काही तक्रारी संबंधीची कागदपत्रे सादर करावयाची असल्यास ती वरील नमूद केलेल्या व्हाट्सअँप क्रमांकावर पाठवावीत असे ही आवाहन वसईतील परिमंडळ 2 चे पोलिस उप आयुक्त संजय कुमार पाटील यांनी केले आहे. 

टॅग्स :Policeपोलिसmira roadमीरा रोडVasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या