शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंग शास्त्रोक्त पद्धतीने बंद होणार

By admin | Updated: February 23, 2016 02:22 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मागवलेल्या निविदेला सोमवारी पार पडलेल्या

कल्याण : न्यायालयाच्या आदेशानुसार आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने मागवलेल्या निविदेला सोमवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ही प्रक्रिया कंत्राटदारामार्फत सुरू होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाविषयी उच्च न्यायालयात कल्याण-डोंबिवली महापालिकेविरोधात याचिका न्यायप्रविष्ट आहे. २८ कोटी ४१ लाख रुपये किमतीची ही निविदा अग्रवाल सोल्युशन व कृषी रसायन या दोन कंपन्यांनी भरली होती. तिला स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांनी मंजुरी दिली. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी सांगितले. आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचे क्षेत्रफळ ५.८८ हेक्टर इतके आहे. सध्या डम्पिंग ग्राउंडवर १५.३० लक्ष घनमीटर कचरा साचलेला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने तो हटवल्यावर रिक्त होणाऱ्या चार हेक्टर जागेचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. तेथे बगीचा व उद्यान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदार कंपनीला अटीशर्ती घालण्यात आलेल्या आहेत. आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद केल्यावर शास्त्रोक्त भरावभूमी बारावे येथे विकसित करण्याचे कामही अग्रवाल व कृषी या कंपनीलाच दिले गेले. हे काम १९ कोटी १३ लाख रुपये किमतीचे आहे. कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उंबर्डे येथे उभारण्याचे काम अवी प्लॉस्ट या मुंबईच्या कंत्राट कंपनीला दिले आहे. त्याची किंमत दोन कोटी ३० लाख रुपये आहे. त्यात भांडवली व देखभाल दुरुस्तीची रक्कम मिळून हा खर्च दोन कोटी ३० लाख रुपये आहे. त्यालाही आज समितीने मंजुरी दिली.कल्याण पूर्वेतील तिसगाव येथेही १० टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. पण, दोनच निविदा आल्याने फेरनिविदा मागविल्या जाणार आहेत. उंबर्डे येथे ३०० मेट्रीक टन, बारावे व मांडा येथे प्रत्येकी १५० मेट्रीक घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव आहे. उंबर्डे येथे वेस्ट टू एनर्जीसाठी चार वेळा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळलेला नाही. त्यामुळे आता केवळ आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करून त्या बदल्यात बारावे येथे सुरू करायचे आहे. मांडा येथील जागा पालिकेच्या ताब्यात नाही. पालिका १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबवून कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून बायोगॅस तयार करणार होती. त्यापैकी एकाच प्रकल्पाला मंजुरी देणे शक्य झाले आहे. बाकीचे थंड बस्त्यात आहेत, असे स्पष्ट झाले.