शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशा वाजणारच!

By admin | Updated: March 25, 2017 01:26 IST

आयोजक पाठीशी राहिले नाहीत, तरी चालेल; आम्ही चौकाचौकात ढोल वाजवून आमची कला सादर करू, असा पवित्रा घेत ठाण्यातील

ठाणे : आयोजक पाठीशी राहिले नाहीत, तरी चालेल; आम्ही चौकाचौकात ढोल वाजवून आमची कला सादर करू, असा पवित्रा घेत ठाण्यातील ढोल-ताशा पथकांनी यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत ढोल वाजणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. मनसेने या पथकांसोबत असल्याचा पुनरूच्चार केला, तर शिवसेना, भाजपासह अन्य राजकीय पक्षांनी नव्याने कोणतीही भूमिका घेतली नाही. सरकारने पारंपरिक वाद्यांना उत्सवासाठी सवलत देण्याचे आश्वासन दिल्याने त्याबाबतचे आदेश हाती पडल्यावर पोलीस याबाबत सुधारित आदेश काढणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी पथकांसोबत बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढू असे सांगणाऱ्या आयोजकांनी संध्याकाळपर्यंत बैठक घेतली नाही. आम्हालाही निरोप दिला नाही, असे पथकांनी सांगितले. त्याबाबत चौकशी केल्यावर रात्री उशिरा काही पथकांना फोन करून चर्चेसाठी पाचारण केले. मनसेने मात्र दिवसभरात विविध पथकांशी बोलून त्यांना धीर दिला. त्याचवेळी या पथकांची एकत्र संघटना स्थापन करून त्याचे नेतृत्त्व करण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी बैठकही झाली. अशी संघटना स्थापन झाल्यावर तिच्या नेतृत्त्वाखाली विविध पक्ष, संघटनांशी वाटाघाटी करण्याचा पवित्रा काही पथकांनी जाहीर केला. आयोजकांनी मात्र याबाबतच्या कोणत्याही विषयावर काहीही भूमिका न घेता पथके, पोलीस, पक्ष जो निर्णय घेतील त्याची वाट पाहण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांनी याबाबत स्वत:हून कोणताही पुढाकार घेतला नाही.आवाजाच्या मर्यादेमुळे ढोल-ताशा पथकांना यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी करुन न घेण्याचा निर्णय आयोजकांनी जाहीर केला, पण वाटाघाटींचा पर्याय खुला ठेवला होता. आयोजकांच्या या भूमिकेला ठाण्यातील सर्व ढोल-ताशा पथकांनी हरकत घेतली आणि आमची बाजू ऐकून न घेता परस्पर निर्णय घेतल्याने आता आमंत्रण दिले तरी स्वागतयात्रेत जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. या पथकांची बैठक शुक्रवारी झाली. यात काही पथकांनी स्वागतयात्रेत आम्ही वादन करण्याचे जाहीर केले, पण हे वादन न्यासाच्यावतीने नव्हे तर वैयक्तिक स्तरावर असेल, असे जाहीर केले. गुन्हे दाखल होत असतील तर होऊ दे; पण वादन करणार हे नक्की असे ठरविले आहे. या पथकांशी चर्चेबाबत विश्वस्तांना संध्याकाळी विचारल्यावर त्यांनी अद्याप बैठक झाली नसल्याचे सांगितले; पण पथके जर वादन करत असतील, तर त्याला आमची हरकत नाही. पण त्याच्या परिणामांची जबाबदारी आमची नसेल, अशी भूमिका घेतली. (प्रतिनिधी)