शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपातून राष्ट्रवादीत येणाऱ्यांना दोन वर्षे पदे देऊ नका; पवारांच्या त्यागाची किंमत समजलीच पाहिजे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 06:54 IST

पक्ष म्हणजे खाणावळ नव्हे, पवारांच्या त्यागाची किंमत समजलीच पाहिजे

अंबरनाथ : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्यांवर विश्वास नाही. प्रवेश करणाऱ्यांना दोन वर्षे प्रतीक्षा करावीच लागेल. पक्ष वाढीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या त्यागाची किंमत त्यांना समजली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे खानावळ नाही, असे खडेबोल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुनावले. आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे काही क्षणातच पडले.

अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी कार्यकर्ता आढावा बैठक झाली. भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना वेटिंगमध्ये राहण्याचा सल्ला आव्हाड यांनी दिला, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना इडीने पाठवलेली नोटीस आणि साताऱ्यातील भर पावसातील प्रचारसभा यामुळे गेम चेंज झाला आणि राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलीच चपराक बसली. 

या घटनांमुळे राष्ट्रवादीने दमदार उभारी घेत ५५ आमदार विजयी झाले. केंद्र सरकारची शेती आणि कामगार विरोधी धोरणे चिंताजनक असल्याचे सांगून सुळे यांनी मोदी यांच्यावर कडाडून टीका केली. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद संसदेतून निवृत्त होणार म्हणून पंतप्रधानांना सभागृहात अश्रू अनावर झाले, मात्र नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत, असा टोला सुळे यांनी लगावला.

विधानसभा निवडणुकीत भाजपला कात्रजचा घाट दाखविण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असून, आता नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येईल, असा दावा प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ यांनी केला. यावेळी प्रमोद हिंदुराव, महेश तपासे, जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे , विद्या वेखंडे, आयोजक सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसambernathअंबरनाथ