शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

डोंबिवली : आधी रिक्षा स्टँड द्या मगच नव्या रिक्षा रस्त्यावर आणा, रिक्षा चालक-मालक युनियनचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 7:02 PM

शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात

डोंबिवली: शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात. आधी त्या विभागाच्या अधिका-यांनी डोंबिवलीत यावे, वस्तूस्थितीचा अभ्यास करावा, स्टँडची सोय करावी आणि त्यानंतरच नवे इरादापत्र द्यावे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका पश्चिमेकडील रिक्षा चालक मालक युनियनने घेतली आहे.युनियनचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या शहरामध्ये आरटीओ अधिकारी कधी बघितलेही नाहीत. त्यांना येथे बसण्यासाठी आम्ही सर्व युनियन एकत्र आलो होतो, ट्रॅफिक गार्डनमध्ये आरटीओ अधिका-यांना ठाण मांडावे असे आवाहन केले होते, त्याचे पुढे काय झाले हे माहित नाही. असे एक ना अनेक प्रस्ताव आमच्यासह अन्य युनयिनने दिले होते, पण ती सर्व पत्र वेळोवेळी बासनात गुंडाळली गेली का? असा सवालही त्यांनी केला.आता जो मागेल त्याला इरादा पत्र या तत्वावर परमिट देण्यात येत आहेत, द्यायला हरकत नाही, पण शहराची वाहन क्षमता संपलेली आहे. त्याचे काय? स्थानक परिसरात सकाळ संध्याकाळ सोडाच कधीही कोंडीच असते. नागरिकांसह रिक्षा चालकांनाही या कोंडीतून मार्ग कसा काढावा हा प्रश्न आहे. असे असतांना आणखी वाहने कशाला आणायची? आणायची असली तरी नव्यांसह जुन्या वाहनांसाठी सुसज्ज रिक्षा स्टँड हवा. रिक्षा चालकांना स्वच्छतागृह, आरामाची जागा हवी. या मुलभूत सुविधा कोण देणार? कल्याण-डोंबिवली महापालिका त्याकडे कानाडोळा करते, वाहतूक विभाग हात वर करतो, मग इराद्यासाठी हजारो रुपये, रिक्षेसाठी लाखो रुपये खर्चून हाती काय पडणार असा सवाल म्हात्रे यांनी केला. जे इरादापत्र घेत आहेत त्या नागरिकांनीही भविष्यातील अडथळयांचा विचार करावा, आधी सुविधा मिळवाव्यात आणि वाहने घ्यावीत. अन्यथा मोठा पेच निर्माण होणार असून त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेतील असेही ते म्हणाले.त्यासंदर्भात गुरुवारी संध्याकाळी रिक्षा चालक-मालकांची महत्वाची बैठक पश्चिमेला मच्छीमार्केटलगत होणार आहे. नव्या इरादापत्रांना विरोध नसून आरटीओ अधिका-यांच्या दुटप्पी भूमिकेसाठी ठोस पावले घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्या बैठकीतील ठराव, नीवेदन कल्याण,ठाणे आरटीओ आणि परिवहन मंत्र्यांना देणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.* या आधीही जून महिन्यात भाजपाप्रणित रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर यांनी इरादापत्रांसंदर्भात तीव्र आक्षेप घेतले होते. कल्याणच्या रिक्षा युनयिनचे पदाधिकारी नाना पेणकर यांनीही आक्षेप घेत पत्र दिली आहेत. त्याची सखोल चौकशी व्हावी. तसेच सातत्याने रिक्षा युनियन यासंदर्भात आवाज उठवत असूनही त्याकडे कानाडोळा का केला जात आहे असा सवाल रिक्षा चालक मालक युनियनच्या पदाधिका-यांनी केला.

टॅग्स :dombivaliडोंबिवली