शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

मना... आत्महत्येला नाही म्हणा!

By admin | Updated: September 2, 2016 03:45 IST

आत्महत्येचा विचार मनात येणे, हा मानसिक विकृतीचा प्रकार आहे. नकारात्मक विचाराने प्रभावित झालेली व्यक्ती आत्महत्या करते. अशा व्यक्तींना त्यापासून रोखण्याकरिता मुंबई

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवलीआत्महत्येचा विचार मनात येणे, हा मानसिक विकृतीचा प्रकार आहे. नकारात्मक विचाराने प्रभावित झालेली व्यक्ती आत्महत्या करते. अशा व्यक्तींना त्यापासून रोखण्याकरिता मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीने गणेशोत्सवात ‘गणपतीबाप्पा मोरया, आत्महत्येपासून प्रवृत्त व्हा’ हा जगजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे.जगात ४० सेंकदाला एकजण आणि वर्षाला एक लाख लोक आत्महत्या करतात. आत्महत्येची विविध कारणे मानसशास्त्रात नमूद केली आहेत. मात्र, नकारात्मक विचारातून व्यक्ती आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होते. तिला त्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा विषय गाजत आहे. समाजातील ही वाढती प्रवृत्ती रोखण्यासाठी मानसशास्त्र विषय शिकणारे विद्यार्थी पुढे आले आहेत. विद्यापीठातील डॉ. उमेश भरते आणि नीळकंठ बनकर यांनी याविषयी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले आहे. १० सप्टेंबर रोजी ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस’ साजरा केला जातो. यंदाचा गणेशोत्सव हा ५ ते १५ सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे. १० सप्टेंबर ही तारीख यादरम्यान येते. गेली पाच वर्षे हे विद्यार्थी या दिनाचे औचित्य साधून जनजागृती करीत आहेत. लोकमान्य टिळकांनी जनजागृती व सामाजिक प्रबोधनासाठी घरातील गणपती रस्त्यावर आणला व त्याला सार्वजनिक स्वरूप दिले. त्याच उद्देशाला अनुसरून समाजप्रबोधन करण्यासाठी मानसशास्त्र विभागाने एक पाऊल पुढे टाकले आहे. मध्य, उत्तर, दक्षिण मुंबईसह ठाणे, रायगड या परिसरातील गणेशोत्सव मंडळांना आत्महत्या रोखण्याच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या विद्यार्थ्यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील काही मंडळे उपक्रमात सहभागी झाली आहेत. मंडळाच्या ठिकाणी जाऊन हे प्रबोधन केले जाणार आहे. या उपक्रमातील सक्रिय विद्यार्थिनी नमिता सारंग हिने सांगितले की, मंडळाच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी आत्महत्येची कारणे काय, आत्महत्येचा विचार मनात आल्यावर तो कसा रोखायचा, याचे मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी पोस्टर्स तयार करण्यात आलेली आहे. हेल्पलाइन सेवा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे १० सप्टेंबरला सर्व विद्यार्थी आत्महत्येविरोधात फ्लॅश मॉब काढणार आहेत. सकारात्मक जीवन जगण्याचा संदेश या विभागाचे विद्यार्थी देणार असून त्यांनी अनेक गणेश मंडळांना आवाहन केले आहे. त्याला काही मंडळांनी प्रतिसादही दिला आहे. काही गणेशोत्सव मंडळांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला असून तो वाढणार असल्याचा विश्वास विद्यार्थिवर्गाकडून व्यक्त केला जात आहे.