शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या बदलापूरमधील जय्यत तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडाझडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:46 IST

राज्य शासनाने या स्पर्धेच्या अनुदानात ५० लाखांवरून थेट ७५ लाखांपर्यंत वाढ केल्याने यंदाचे आयोजन अधिक भव्य होणार आहे.

ठाणे : बदलापूर जिमखाना मैदानावर होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५-२६’ स्पर्धेच्या तयारीचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी थेट आढावा घेत संबंधित यंत्रणांना काटेकोर नियोजनाचे आदेश दिले. स्पर्धा केवळ औपचारिक न राहता क्रीडा महोत्सवाच्या दर्जाची व्हावी, असा स्पष्ट निर्देश त्यांनी आजच्या बैठकीत दिला.

राज्य शासनाने या स्पर्धेच्या अनुदानात ५० लाखांवरून थेट ७५ लाखांपर्यंत वाढ केल्याने यंदाचे आयोजन अधिक भव्य होणार आहे. मात्र निधी वाढीसोबतच दर्जाही उंचावला गेला पाहिजे, अन्यथा जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा त्यांनी संबंधिताना या बैठकीत दिला आहे.

स्पर्धा १३ ते १७ मेदरम्यान रंगणार आहे. स्पर्धेत १९ व २१ वर्षांखालील मुला-मुलींचे ३२ संघ सहभागी होणार असून सुमारे ५४८ खेळाडू, प्रशिक्षक व अधिकारी ठाण्यात दाखल होणार आहेत. खेळाडूंची निवास, भोजन, वाहतूक, सुरक्षा आणि मैदानावरील प्रकाशयोजना यावर विशेष भर देण्याचे आदेश देण्यात आले.

विजेत्यांच्या बक्षीस रकमेचे वितरण, भत्ते व प्रवास खर्च पारदर्शक पद्धतीनेच व्हावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करत ठाण्याची क्रीडा व आदरातिथ्य परंपरा जपावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Collector reviews preparations for state-level volleyball tournament in Badlapur.

Web Summary : Collector reviewed preparations for the state-level volleyball tournament in Badlapur. He instructed officials to ensure meticulous planning and a high-quality event, emphasizing transparent prize distribution and coordinated efforts for player well-being.
टॅग्स :badlapurबदलापूर