मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद नियुक्तीचा वाद थेट पवारांच्या दरबारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 02:42 PM2021-02-09T14:42:12+5:302021-02-09T14:43:33+5:30

Mira Bhayander Politics News : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून दिड महिना झाला नाही तोच स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेता अंकुश मालुसरे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याने विरोध

Dispute over appointment of Mira Bhayander NCP District President | मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद नियुक्तीचा वाद थेट पवारांच्या दरबारी

मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद नियुक्तीचा वाद थेट पवारांच्या दरबारी

googlenewsNext

मीरारोड - राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून दिड महिना झाला नाही तोच स्थानिकांना कोणाला विश्वासात न घेता अंकुश मालुसरे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या विरोधात मीरा भाईंदर मधील राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ थेट राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या दरबारी पोहचले .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात पक्ष सोडून जाणारे पदाधिकारी - नेते आता महाविकास आल्या नंतर पुन्हा राष्ट्रवादीत घर वापसी करू लागले आहेत . मीरा भाईंदर मध्ये देखील माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील व आसिफ शेख सह माजी महापौर निर्मला सावळे आदी अनेकांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश केला . मालुसरे सुद्धा राष्ट्रवादीत परत आले .

शहरात एकेकाळी सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बळकट करायची तर सक्षम - लोकाभिमुख नेतृत्वाची उणीव असली तरी पडत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर सह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच २ फेब्रुवारी रोजी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले .

त्यातूनच पेंडुरकर सह पक्षाच्या पदधकाऱ्यांनी मालुसरे यांच्या नियुक्ती विरोधात संताप व्यक्त करत त्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कडे गाऱ्हाणे मांडले . त्या नंतर खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा घडला प्रकार सांगण्यात आला . यावेळी मसूलरे यांच्या बद्दलच्या असलेल्या तक्रारी सुद्धा नेत्यानं समोर मांडण्यात आल्या . पवार व सुप्रिया यांनी आपण जातीने प्रदेशाध्यक्षांशी बोलून माहिती घेऊ असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले .

मालुसरे यांच्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीची माहिती मीरा भाईंदरचे निरीक्षक संतोष धुवाळी यांना सुद्धा नसल्याची चर्चा आहे . राष्ट्रवादीच्या फ्रन्टल सेलचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी , ब्लॉक अध्यक्ष , जिल्हा समिती पदाधिकारी , बूथ अध्यक्ष आदींनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या हितासाठी मालुसरे यांच्या नियुक्तीला विरोध केला असल्याचे पेंडुरकर म्हणाले .

Web Title: Dispute over appointment of Mira Bhayander NCP District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.