शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागातच लागणार कचऱ्याची विल्हेवाट

By admin | Updated: March 24, 2017 01:03 IST

पश्चिमेतील कोकण विभाग वसाहतीच्या शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे या

कल्याण : पश्चिमेतील कोकण विभाग वसाहतीच्या शिवसेना नगरसेविका नीलिमा पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे या प्रभागातील ओल्या कचऱ्यावर आता प्रभागातच प्रक्रिया होणार आहे. गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक संजय पाटील, मनसृष्टी संस्थेच्या संचालिका वैशाली तांबट आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभागात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत तयार करू शकतो, ही संकल्पना मनसृष्टी संस्थेच्या तांबट यांनी मांडली. त्यांच्या सूचनेनुसार नगरसेविका पाटील यांनी गांडूळ खत प्रकल्प सुरू केला आहे. महापालिकेच्या प्रकल्पाची वाट न पाहता एक लहान प्रयत्न पाटील यांनी सुरू केल्याने त्यांच्या या सकारात्मक कृतीचे देवळेकर यांनी कौतुक केले. तसेच हा प्रकल्प नियमित सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रभागातील कचरा प्रभागात खतप्रक्रियेसाठी वापरला जाईल. त्यामुळे प्रभागात दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसेच कचरा वाहून नेण्यासाठी फक्त सुक्या कचऱ्याच्या वाहतुकीवर खर्च करावा लागेल. जैव कचरा गांडूळ खतासाठी वापरला जाईल. कल्याण-डोंबिवली महापालिका केवळ दोन टन कचऱ्यावर प्रक्रिया करते. शहरातून गोळा होणाऱ्या ५७० मेट्रीक टन कचऱ्यापैकी केवळ सहा टन कचऱ्यावर महापालिका प्रक्रिया करते. महापालिकेने १२ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित केले आहे. त्यापैकी उंबर्डे येथेच १० टन क्षमतेचा प्रकल्प सुरू झाला आहे. प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाने पाटील यांच्या धर्तीवर प्रभागात लहान गांडूळ खत प्रकल्प सुरू केल्यास कचरा वाहतुकीचा खर्च कमी होऊन जागच्या जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे कचराकुंडीत कचरा साठणार नाही. तसेच दुर्गंधीचा सामनाही करावा लागणार नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकावा, अशी तंबी महापालिकेने दिली होती. मात्र, ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे काम महापालिकेने सुरूच केलेले नाही. केवळ कारवाईचे इशारे देऊन कचरा वर्गीकृत पद्धतीने गोळा होणार नाही. त्यासाठी नागरिकांना शिस्त लावली गेली पाहिजे. प्रत्येक प्रभागात कचऱ्यापासून २४ तासांत खतनिर्मिती यंत्र पुरवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पटलावर आला होता. त्या यंत्र खरेदीचे घोडे कुठे अडले, हे अद्याप कोणालाही माहिती नाही. तसेच महापालिका ५०० कर्मचाऱ्यांना कचरा खाणाऱ्या जादूच्या बादल्या पुरवल्या जाणार होत्या. (प्रतिनिधी)