शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेला नापसंती

By admin | Updated: June 29, 2017 02:47 IST

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील झोपड्यांच्या विकासासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील झोपड्यांच्या विकासासाठी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी उत्तनच्या धावगी-डोंगर येथील झोपडपट्टीची नुकतीच पाहणी केली. त्यावेळी झोपडीधारकांनी योजनेला नापसंती दर्शवत योजनेतील तरतुदीनुसार कर्ज काढण्यासह निश्चित रक्कम भरण्यास नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तत्कालिन राजीव आवास योजनेतंर्गत मीरा-भार्इंदरमधील झोपड्यांचे अनेक वर्षापासून सर्वेक्षण होऊनही त्या योजनेचे फलित प्राप्त झाले नसले तरी युती सरकारची प्रधानमंत्री आवास योजना मात्र प्रभावशाली असल्याचा दावा केला जात आहे. या योजनेतंर्गत पालिकेने शहरातील ४६ झोपडपट्यांचे सर्र्वेक्षण सुरू केले. शहरातील सुमारे २८३ एकर जागेवर वसलेल्या या झोपडपट्यांतील झोपड्यांची एकूण संख्या २७ हजार ५०७ इतकी असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यापैकी १७ हजार २६२ झोपड्यांचेच सर्र्वेक्षण पूर्ण झाले. उर्वरित झोपड्या सर्र्वेक्षणापासून वंचित ठेवल्या आहेत. यातील बहुतांश झोपडपट्या केंद्राच्या मीठ विभागाच्या तर काही राज्य सरकारच्या व पालिकेच्या सुविधा भूखंडांवर वसल्या आहेत. पालिकेने एकूण ४६ झोपडपट्यांपैकी उत्तनच्या धावगी-डोंगर येथील लालबहाद्दूर शास्त्रीनगर, भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व पूर्वेकडील आदर्श इंदिरानगर झोपडपट्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निवड केली आहे. या झोपडपट्याही सरकारी व पालिकेच्या भूखंडावर असून आंबेडकरनगर व इंदिरानगर या झोपडपट्या सीआरझेड बाधित आहेत. त्यामुळे योजना तडीस जाण्यास अडचण असली तरी तरी त्याची पूर्तता सरकार दप्तरी तसेच पालिकेच्या विकास आराखड्यातील बदलानुसार केली जाईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. सर्र्वेक्षण पूर्ण झालेल्या झोपडपट्यांतील एकूण ३ हजार २०० झोपडीधारकांना लाभार्थी म्हणून जाहीर करण्यात आले असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च अंदाजित आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षातील पहिल्या टप्प्यात सुमारे ५० कोटींची तरतूद पालिकेकडून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या योजनेच्या पूर्णत्वासाठी सल्लाागाराची नियुक्ती केली आहे. या समितीने बैठकीत योजनेची माहिती देण्यात आली. त्यात केंद्र व राज्य सरकारचा आर्थिक वाटा असला तरी झोपडीधारकांनाही पक्की घरे मिळवण्यासाठी सुमारे ३० ते ४० टक्के रक्कम मोजावी लागणार आहे.