शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये डिजिटल अरेस्टचा प्रकार, सेवानिवृत्त वृद्धेला ६० लाख २० हजारांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:51 IST

याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदानंद नाईक/उल्हासनगर : कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्टच्या नावाखाली धमकावून एका टोळक्याने ६० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. व्हॉट्सॲपवर पोलिसांचा स्टेटस लावून तसेच बनावट सरकारी कागदपत्रे आणि समन्स वापरून ही फसवणूक करण्यात आली असून याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

उल्हासनगर कॅम्प नं-१, दयाळू आयस्क्रीम दुकान परिसरात सेवानिवृत्त विद्या परसराम रामानी कुटुंबासह राहतात. १७ ते २९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मोबाईल व्हॉट्सॲपवर एका टोळक्याचा फोन आला. रिया शर्मा, प्रदीप जैस्वाल, विश्वास पाटील आणि एका अनोळखी व्यक्ती असे नाव सांगण्यात आले. या टोळक्याने व्हॉट्सॲपवर पोलिसांचा स्टेटस ठेवला होता. बनावट पोलीस ओळखपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवून त्यांनी स्वतःची ओळख पोलीस म्हणून करून दिली. इतकेच नव्हे तर, सुप्रीम कोर्ट, डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या नावाने बनावट नोटिसा व समन्स तयार करून रामानी पाठवले. 

या टोळक्यानी बनावट कागदपत्रांच्या आधारे, डिजिटल अटकेची भीती दाखवून त्यांनी रामानी यांना 'व्हेरिफिकेशन'साठी त्यांच्या विविध बँक खात्यात एकूण ६० लाख २० हजार रुपये आरोपींनी स्वतःकडे वळवून घेवून त्यांची आर्थिक फसवणूक केली. विद्या रामानी यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पोलीस या डिजिटल फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेत असून चार जणा विरोधात गुन्हा दाखल झाला.

 नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन अलिकडे 'डिजिटल अरेस्ट, फेक पार्सल आणि सरकारी एजन्सीच्या नावाने होणारे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. पोलीस किंवा बँक कधीही व्हॉट्सॲपद्वारे समन्स पाठवत नाहीत किंवा 'व्हेरिफिकेशन'च्या नावाखाली थेट बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगत नाहीत. अशा प्रकारच्या कोणत्याही धमकीच्या कॉलला बळी न पडता, तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar: Senior citizen duped of ₹60 lakh in digital arrest scam.

Web Summary : A retired woman in Ulhasnagar lost ₹60.2 lakh to fraudsters using fake police IDs and court documents via WhatsApp. Police are investigating the cybercrime, urging vigilance against such scams.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमulhasnagarउल्हासनगर