शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंचा रोड शो मधून संवाद

By admin | Updated: February 20, 2017 05:54 IST

महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, रविवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात प्रचार रॅली काढली

ठाणे : महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, रविवारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात प्रचार रॅली काढली. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत पोहोचून त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आणि मतदारांशी संवाद साधला. आनंदनगर भागातून दुपारी ३ च्या सुमारास रॅलीला सुरुवात झाली. हाती भगवे झेंडे घेतलेले दुचाकीस्वार शिवसैनिक आणि मागे उघड्या जीपमध्ये ठाणेकरांना अभिवादन करणारे आदित्य ठाकरे, असे चित्र होते. त्यांच्यासोबत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते होते. कोपरी पुलावरून तीनहातनाका, मुलुंड चेकनाका, पडवळनगर, किसननगर, आयटीआय सर्कल, वागळे इस्टेट डेपो, लोकमान्यनगर, खोपट, चंदनवाडी, मनपा चौक, रायगडआळी, नौपाडा, गावदेवी मैदान, माजिवडा आणि कोलबाडमार्गे संध्याकाळी रॅली जांभळीनाक्यावर पोहोचली. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी उमेदवारांनी तसेच शिवसैनिकांनी या युवा नेत्याचे स्वागत केले. या चौकातील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला त्यांनी आदरांजली अर्पण केली आणि आनंद आश्रमात जाऊन त्यांनी दिघे यांच्या स्मृतीस  अभिवादन केले. कार्यकर्त्यांशी हितगुज करून ते मार्गस्थ झाले. (प्रतिनिधी)\मुख्यमंत्री सभागृहात, ठाकरे रस्त्यावरआदित्य ठाकरे यांचा रोड शो आणि मुख्यमंत्र्यांची सभा एकाच वेळी सुरू होती. सरस्वती महाविद्यालयात मुख्यमंत्र्यांची सभा सुरू असताना ठाकरे यांची रॅली तेथून मार्गस्थ झाली. महाविद्यालयासमोरून रॅली जात असताना शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने हा परिसर दणाणून गेला. नौपाडा परिसरातील मनसे कार्यालयासमोर रॅली पोहोचली, तेव्हाही असेच चित्र पाहावयास मिळाले.