शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

पोलीस आयुक्तालय होऊन देखील भूमिपुत्रांच्या तक्रारींवर कारवाईस पोलिसांची टाळाटाळ    

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 3:43 PM

मीरा भाईंदर मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या तसेच गैरप्रकाराने जमिनी बळकावल्याच्या अनेक तक्रारी असून देखील मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्यांना न्याय दिला जात नसल्याचा संताप स्थानिकांच्या संघटनांनी व्यक्त केला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना जमिनीच्या व्यवहारात फसवणूक केल्याच्या तसेच गैरप्रकाराने जमिनी बळकावल्याच्या अनेक तक्रारी असून देखील मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयात त्यांना न्याय दिला जात नसल्याचा संताप स्थानिकांच्या संघटनांनी व्यक्त केला आहे . पोलीस आयुक्तालय झाल्याने आणि त्यातही आयुक्त पदी सदानंद दातेंसारखे ज्येष्ठ अधिकारी लाभून देखील भूमिपुत्रांना न्याय मिळत नसेल तर आयुक्तालय चुलीत घालायचे का ? असा सवाल ह्या संघटनांनी केला आहे . 

मीरा भाईंदर मधील बहुतांश जमिनी ह्या स्थानिक आदिवासी , आगरी , कोळी , ख्रिस्ती व सोमवंशीय पाठारे समाजाच्या होत्या व आहेत . मुंबईला लागून असल्याने मीरा भाईंदर मधील जमिनींना सोन्याचे भाव आले आणि राजकारण्यांसह बिल्डरांनी जमिनी घेण्याचा सपाटा लावला . परंतु काही राजकारणी - बिल्डरांनी भूमिपुत्रांच्या अज्ञानतेचा , विश्वासाचा गैरफायदा घेत खोट्या स्वाक्षऱ्या करणे , नियमबाह्य अनोंदणीकृत मुखत्यार पत्र , बनावट कागदपत्रे , अधिकाऱ्यांच्या संगनमताने परस्पर जमीन व्यवहाराची नोंदणी करून घेणे आदी प्रकार केले . काहींनी बळजबरी कब्जा केला . कावडी मोलाने जमिनी घ्या पासून अनेकांना मोबदला सुद्धा दिला गेला नाही अश्या तक्रारी आहेत. 

हे सर्व करताना काही राजकारणी व बिल्डरांनी पोलीस आणि पालिका प्रशासनाला हाताशी धरून भूमिपुत्रांच्या तक्रारीना केराची टोपली दाखवली . अगदी पोलीस ठाण्या पासून पोलीस आयुक्तां पर्यंत तक्रारी होऊन देखील कार्यवाही केली जात नाही . गुन्हे दाखल केले जात नाहीत . संबंध नसलेले तांत्रिक मुद्दे मुद्दाम उपस्थित केले जातात . जास्तच पाठपुरावा भूमिपुत्र करत असेल तर थातुर मातुर कार्यवाही दाखवून बोळवण केली जाते असे आरोप होत आहेत .   

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा हाताशी धरून सर्रास बांधकाम परवानग्या मिळवल्या जातात व बांधकामे केली जातात. टीडीआर घेतला . स्वतः करोडो रुपयांची माया गोळा करताना ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या भूमिपुत्रांना मोबदला दिला नाही. दिलाच तर तो कवडीमोलाने दिला . पोलीस आणि पालिका स्तरावर अनेक तक्रारी होत असून देखील भूमिपुत्रां ऐवजी भूमाफियांना पाठीशी घालण्याचे काम ह्या यंत्रणा करत असल्याचे आरोप गंभीर आहेत . 

ऍड . सुशांत पाटील ( सचिव,  आगरी एकता समाज ) - पोलीस जर राजकारणी व धनदांडग्याची चाकरी करत भूमिपुत्रांवर अन्याय करणे थांबवणार नसतील तर भुमीपुत्रांसाठी रस्त्यावर उतरू. कायदा हातात घेऊ . आणि त्याची जबाबदारी पोलिसांची असेल .  पोलीस आयुक्तालय झाले आणि दातें सारखे ज्येष्ठ अनुभवी आयुक्त लाभले जेणे करून भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळेल अशा आशा होत्या . पण त्या फोल ठरल्या असून पोलीस आयुक्तालय चुलीत घालायचे काय ? 

सचिन घरत ( पदाधिकारी - स्थानिक भूमिपुत्र संघटना आणि मराठी एकीकरण समिती ) - काही पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी भूमिपुत्रांना न्याय देण्या ऐवजी काही राजकारणी व बिल्डरांच्या घरी पाणी भरत भूमिपुत्रांवर अन्याय करून त्यांना नागवले आहे . त्यांना देशोधडीला लावले आहे . या विरोधात पालिका आयुक्तांना निवेदने दिली असून पोलीस आयुक्तांना सुद्धा भेटणार आहोत . अन्यथा पोलीस व पालिके विरुद्ध आंदोलने करू . 

टॅग्स :PoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर