शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

धोकादायक पत्रीपूल पाडला!; कल्याणचा लँडमार्क झाला इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 3:22 AM

धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल पाडण्याची मोहीम रविवारी फत्ते करण्यात आली. या कामासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

कल्याण : धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल पाडण्याची मोहीम रविवारी फत्ते करण्यात आली. या कामासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. प्रत्यक्षात दुपारी २.३५ वाजताच हे आॅपरेशन फत्ते करण्यात आले. दुपारी २.४० वाजता कल्याणहून वाराणसी महानगरी एक्स्प्रेस मुंबईला रवाना करण्यात आली. १९१४ साली बांधण्यात आलेल्या आणि आता इतिहासदरबारी नोंद झालेल्या या पुलाची यापुढे नाममात्र आठवण राहणार आहे.मेगाब्लॉकदरम्यान कल्याण-डोंबिवलीदरम्यानची लोकलसेवा बंद करून अन्य १४० लोकलफेऱ्याही रद्द करण्यात आल्या होत्या. काही लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले होते. सीएसएमटीहून कर्जतसाठी सकाळी ८.१६ वाजता, तर कल्याणहून सकाळी ९ वाजून ९ मिनिटांची लोकल मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. मेगाब्लॉकला सकाळी साडेनऊ वाजता प्रारंभ होणार होता; परंतु सकाळी ९ वाजतापासूनच डोंबिवलीला आलेल्या लोकल कल्याणच्या दिशेने रवाना केल्या जात नव्हत्या. त्या डोंबिवली स्थानकातच रद्द केल्या जात होत्या. यामुळे कल्याणकडे जाणाºया प्रवाशांचे मेगाब्लॉकच्या आधीच हाल झाले. यासंदर्भात कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने प्रवासी गोंधळले होते.मेगाब्लॉकमध्ये कल्याण-डोंबिवलीदरम्यान एकही लोकल धावणार नसल्याने त्याचा ताण रस्ता वाहतुकीवर पडण्याची शक्यता गृहीत धरून सकाळपासून वाहतूक व शहर पोलीस, केडीएमटी आणि एसटी महामंडळाची यंत्रणा सज्ज होती. शिसे आणि लोखंडमिश्रित पत्रीपुलाचे वजन १२० टन होते. पुलामध्ये ६० टनाचे दोन गर्डर होते. ते काढण्यासाठी पूर्वेकडील बाजूला ६०० टन क्षमतेची क्राउल क्रेन, तर पश्चिमेकडील बाजूला ४०० टन क्षमतेच्या क्राउल क्रेनचा वापर करण्यात आला. या क्रेनव्यतिरिक्त २५० टन आणि रेल्वेची १४० टनाची क्रेन आणण्यात आली होती.मुख्य पाडकाम करण्याआधी पत्रीपुलाच्या खालून जाणाºया मध्य रेल्वेच्या २५ हजार व्होल्टच्या वाहिन्या उतरवण्याचे काम करण्यात आले. पत्रीपुलाचे दोन्ही गर्डर बाजूला केल्यानंतर पुलाखालील २५ हजार व्होल्टच्या वाहिन्या पुन्हा जोडण्याचे काम करण्यात आले. दुपारी २.३५ वाजता मोहीम पूर्ण झाल्यानंतर दुपारी २.४० वाजता कल्याणहून पहिली मेल-एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली.मुंबईकरांना मनस्तापपत्री पुलाच्या पाडकामामुळे मुंबईकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पाडकामामुळे लोकलसह मेल-एक्सप्रेस ठप्प असल्याने स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती. मध्य रेल्वेकडून नियोजित वेळेआधी लोकल सेवा सुरू केल्याचा दावा होत असला तरी प्रत्यक्षात सायंकाळी पाच वाजेपर्यंत लोकलची प्रतीक्षा कायम होती. डोंबिवलीहून येणाºया लोकल गर्दीने भरून येत असल्याने मुलुंड, नाहूर, घाटकोपरसह कुर्ला, सायन आणि दादर स्थानकातील प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी कसरत करावी लागली.बघ्यांची एकच गर्दीपूर्वेकडील बाजूचा गर्डर सकाळी ११ वाजून १२ मिनिटांनी, तर पश्चिमेकडील दुसरा गर्डर दुपारी १२ वाजता उचलण्यात आला. दोन्ही गर्डर बाजूला करण्याचे मुख्य काम १२.३० पर्यंत आटोपले.पत्रीपुलाचे पाडकाम पाहण्यास बघ्यांनी एकच गर्दी केली. त्यांना हटवतानापोलिसांचीतारांबळ उडाली.मेगाब्लॉकदरम्यान कल्याण-डोंबिवलीदरम्यानची लोकलसेवा बंद करून अन्य १४० लोकलफेºयाही रद्द करण्यात आल्या होत्या. काही लांब पल्ल्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले होते.

टॅग्स :kalyanकल्याण