शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एमसीएचे केंद्र बदलापूरमध्ये सुरू करण्याची मागणी

By admin | Updated: November 12, 2016 06:26 IST

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएचे केंद्र बदलापुरात सुरू करावे. या माध्यमातून बदलापूर शहरात भव्य सुसज्ज असे क्र ीडांगण निर्माण करण्यात यावे,

बदलापूर : मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएचे केंद्र बदलापुरात सुरू करावे. या माध्यमातून बदलापूर शहरात भव्य सुसज्ज असे क्र ीडांगण निर्माण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते आणि स्टार क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी आशीष दामले यांनी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. शरद पवार यांनीही या मागणीचा सकारात्मक दृष्टीने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबई येथे एमसीएची सर्वसाधारण सभा झाली. या सभेच्या वेळी अध्यक्ष शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी दामले यांनी केली आहे. ठाण्याच्या पलीकडे कर्जतपर्यंत मोठे आणि सुसज्ज असे क्रीडांगण नाही. या पट्ट्यात क्रि केट खेळणारे असंख्य खेळाडू आहेत. अशा सर्व उमद्या खेळाडूंसाठी जर बदलापूर शहरात एमसीएच्या मार्गदर्शनाखाली एक केंद्र सुरू केले, तर या परिसरातील उगवत्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षण मिळून दर्जेदार खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा दामले यांनी व्यक्त केली आहे. बदलापूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडांगण निर्माण करणे, ही काळाची गरज आहे. ही मागणी आजची नाही, तर विलासराव देशमुख हे एमसीएचे अध्यक्ष असताना त्यांच्याकडेसुद्धा ही मागणी केलेली होती. त्यांनीही ती तत्त्वत: मान्य केल्याचे दामले यांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिले आहे. बदलापूर शहरात क्रि केटचा सराव करणाऱ्या संघटना आणि खेळाडू आहेत. शहरात अशा क्र ीडांगणासाठी जागा उपलब्ध असल्याने या मागणीचा विचार करण्याची आग्रही मागणी आपण केली असून शरद पवार यांनीदेखील या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे दामले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)