शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

टाउन प्लानिंग अ‍ॅक्टनुसार कारवाईची मागणी

By admin | Updated: March 22, 2017 01:20 IST

केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाउन प्लानिंग अ‍ॅक्टनुसार कारवाई व्हावी

डोंबिवली : केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या झालेल्या अतिक्रमणप्रकरणी महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाउन प्लानिंग अ‍ॅक्टनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी तक्रारदार विश्वनाथ पटवर्धन यांनी पोलिसांकडे केली. मानपाडा पोलिसांनी शनिवारी पटवर्धन यांचे म्हणणे जाणून घेतले. या वेळी त्यांनी पोलिसांना निवेदन सादर केले. त्यात दखलपात्र गुन्ह्यांप्रकरणी एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.केडीएमसीचे ई प्रभागाचे नवे कार्यालय येथील दावडी परिसरातील ‘रिजन्सी गार्डन’मधील प्रशस्त जागेत सुरू करण्यात आले आहे. परंतु, ही जागा येथील ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीची आहे, असा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे हे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याप्रकरणी पटवर्धन यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आयुक्त ई. रवींद्रन आणि अन्य एका खाजगी संस्थेच्या विरोधात त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्याची चौकशी शनिवारपासून सुरू झाली.ज्ञानेश्वर सोसायटीच्या मालकीच्या असलेल्या जागेवर दादागिरी आणि जबरदस्तीच्या जोरावर केडीएमसी आणि अन्य एका संस्थेने बेकायदा बांधकाम केले आहे. हा प्रकार म्हणजे सोसायटीचा विश्वासघात, फसवणूक आहे. त्यामुळे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करून गुन्हा नोंदवावा, अशी मागणी पटवर्धन यांनी पोलिसांकडे चौकशीदरम्यान केली. (प्रतिनिधी)