शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटन करण्याआधीच रायता पुलावर मृत्यूचे तांडव, एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजुची वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:08 IST

Kalyan News: कल्याण-मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या रायता पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अपूर्ण असताना वाहतुकीसाठी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे.

- राजेश जाधवम्हारळ (कल्याण) - कल्याण-मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या रायता पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम अपूर्ण असताना वाहतुकीसाठी एक मार्गिका खुली करण्यात आली आहे. एकाच मार्गिकेवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्याने प्रवासी टॅक्सी आणि सिमेंट काँक्रीट मिक्सरचा ट्रक समोरासमोर आले. टॅक्सीचा वेग अधिक असल्याने टक्कर होऊन भीषण अपघात झाला. उद्घाटनाआधीच रायता पुलावर मृत्यूचे तांडव पाहायला मिळाले. 

या अपघातानंतर मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी प्रवासी टॅक्सींचा परवाना कधी तपासला का? या मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने याआधी कधी तपासले होते? परवाने वेळच्या वेळी तपासले असते तर अपघात होऊन त्यात निष्पाप जीव गेले नसते, असे त्यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

गतिरोधकांची मागणी : गोवेली आणि रायता येथील शाळेसमोर गतिरोधक असावेत, अशी मागणी स्थानिक गावकरी राजाराम सुरोशी, केतन पवार, ज्ञानेश्वर चोरगे आणि संतोष चोरगे यांनी केली आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. 

‘लोकमत’ने केले होते सतर्क‘जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट जीवघेणे; उपाययोजना केवळ कागदावरच?’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने ११ एप्रिलला वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यात राष्ट्रीय महामार्गावरील संभाव्य अपघात स्थळांबाबत प्रशासनाला सतर्क केले होते. ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी काही सूचना केल्या होत्या. त्याबाबतही माहिती देण्यात आली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Raita Bridge Tragedy: Accident on Unopened Lane Claims Lives

Web Summary : Before inauguration, Raita bridge witnessed a fatal accident due to single-lane traffic. A taxi collided with a concrete mixer. Locals demand speed bumps near schools following the tragedy. Illegal passenger transport questioned.
टॅग्स :Accidentअपघातkalyanकल्याण