शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना सांस्कृतिक मेजवानी

By admin | Updated: February 2, 2016 01:54 IST

ढोलताशा पथकांचे तालबद्ध-लयबद्ध सादरीकरण, मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके, रिदमिक व अ‍ॅक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक खेळाडूंच्या थक्क करणाऱ्या कसरती

ठाणे : ढोलताशा पथकांचे तालबद्ध-लयबद्ध सादरीकरण, मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके, रिदमिक व अ‍ॅक्रोबॅटीक जिम्नॅस्टिक खेळाडूंच्या थक्क करणाऱ्या कसरती, ठसकेबाज लावणी आणि ठाणेकरांना ठेका धरायला लावणारे कोळीनृत्य अशा विविध सादरीकरणांनी रविवारी ठाणे महापालिका आयोजित कला-क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ठाणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर महापौर संजय मोरे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जय जय महाराष्ट्र माझा, सारे जहाँ से अच्छा या सुरावटी बॅण्ड पथकाने आळवल्या. त्या वातावरणात राज्यभरातून आलेल्या खो-खो व कबड्डी संघांच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध संचलन केले. भगवे ध्वज डौलाने फडकवत ढोलताशांच्या गजरात ३०० हून अधिक मुलामुलींनी लेझीम नृत्य साकारले. शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजीव मेहरा, इशांत नकवी आणि महेंद्र चिपळुणकर यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर, नृत्यमय गणेशवंदना सादर करण्यात आली. ठाण्यातील ढोल पथकांमधील ३०० जणांनी साकारलेल्या ढोलताशांच्या जुगलबंदीने क्रीडा संकुलाचा परिसर दणाणून गेला. गायक नंदेश उमप यांनी सादर केलेल्या पोवाड्याला रसिकांची दाद मिळाली. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे यांची विद्यार्थ्यांनी साकारलेली देवीस्मृती उल्लेखनीय ठरली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, तुम्हारी अदा पे वारी वारी, ज्वानीच्या आगीत मशाल हाती, दिल चीज क्या... या गाण्यांवर मेघा घाडगे व मानसी आठवले यांनी नृत्य सादरीकरण केले. विवेक सोनार आणि मनाली देव यांचा संगीतनृत्यातील आगळावेगळा नृत्याविष्कार ठाणेकरांनी अनुभवला. त्यानंतर, सादर करण्यात आलेल्या कोळी नृत्यांवर ठाणेकरांनी ठेका धरला. एकामागून एक सादर झालेल्या कोळी नृत्याला ठाणेकरांनी टाळ्यांची दाद दिली. अप्रतिम कसरती करून कसरतपटूंनी ठाणेकरांचे मन जिंकले. रिदमिक जिम्नॅस्टिक तर ठाणेकरांच्या चांगलेच पसंतीस उतरले. तरु णाईला थिरकवणाऱ्या धमाकेदार नृत्याने समारोप झाला. विश्वविक्रमी १००१ धावांची कामगिरी करणाऱ्या प्रणव धनावडेचा २५ हजार रु पये देऊन सत्कार करण्यात आला. तर, महोत्सवानिमित्त काढलेल्या पुस्तिकेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या महोत्सवाला मिळालेला ठाणेकर कलाकार-खेळाडूंचा प्रतिसाद पाहून पुढील वर्षी आणखी भव्य स्वरूपात महोत्सव साजरा केला जाईल, अशी घोषणा महापौर संजय मोरे यांनी केली.या वेळी आयुक्त संजीव जयस्वाल, विधानपरिषद उपसभापती वसंत डावखरे, खा. राजन विचारे, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, आ. प्रताप सरनाईक, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, सभागृह नेत्या अनिता गौरी, क्र ीडा समितीचे सभापती संभाजी पंडित व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती भागवत, कुणाल रेगे यांनी केले.