CoronaVirus in Thane : ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ वर; १५ जणांवर कस्तुरबात उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 01:06 IST2020-03-28T01:05:24+5:302020-03-28T01:06:07+5:30
CoronaVirus in Thane : शुक्रवारी दिवसभरात १२४ जणांची तपासणी केली. आतापर्यंत १८०० जणांची तपासणी केली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४४ जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ जणांवर उपचार सुरूआहेत. तर १३ संशयितांचा यात समावेश आहे.

CoronaVirus in Thane : ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ वर; १५ जणांवर कस्तुरबात उपचार सुरू
ठाणे : कोरोनाचा आणखी एक रुग्ण ठाण्यात वाढला असून आता त्यांची संख्या ही चार झाली आहे. तर गुरुवारी आढळलेल्या रुग्णांच्या घरामधील तिघांना कस्तुरबा रुग्णालयात पाठविले आहे. त्यामुळे ठाण्यात दिवसाला एक रुग्ण वाढत असल्याचे दिसत आहे. तर शुक्रवारी दिवसभरात १२४ जणांची तपासणी केली. आतापर्यंत १८०० जणांची तपासणी केली आहे. तर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत ४४ जणांना पाठविले असून त्यातील ३० जणांना घरी सोडण्यात आले असून उर्वरित १५ जणांवर उपचार सुरूआहेत. तर १३ संशयितांचा यात समावेश आहे.
पहिला रुग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर आता ३९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर गुरुवारी त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली. तो मुंबईतील खासगी रुग्णालयात कामाला होता. त्याला त्याच रुग्णालयात २० मार्च रोजी उपचारासाठी दाखल केले आहे. परंतु, आता त्याच्या घरातील तिघांना ठाण्यातून कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट तूर्तास प्राप्त झालेले नसल्याची माहिती पालिकेने दिली.
आता पर्यंत पालिकेने २७ मार्च पर्यंत १८०० जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ९२७ नागरिक हे परदेशातून आलेले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ८७३ जणांचा त्यात समावेश आहे. तर आतापर्यंत १७५३ जणांना घरीच देखरेखाली ठेवले आहे.
एका पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार
४४ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील ३० जणांना तपासणी करून घरी सोडले आहे. तर उर्वरित १५ जणांवर उपचार सुरूआहेत. त्यातील एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह होता. तर अन्य ९ जण हे संशयित आहेत. आता अन्य एकाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़