CoronaVirus : शिवसेना-मनसेत कोरोना हॉस्पिटलवरुन राजकारण, भाजपाचा नथीतून तीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 05:15 PM2020-04-25T17:15:41+5:302020-04-25T18:01:39+5:30

CoronaVirus : कोविड १९ साठी डोंबिवलीतील आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही केवळ मनसे आमदार राजू पाटील यांना १० लाख भाडे मिळणार असल्यानेच देण्यात आले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला.

CoronaVirus: Politics from Shiv Sena-MNS on Corona Hospital in Dombivli | CoronaVirus : शिवसेना-मनसेत कोरोना हॉस्पिटलवरुन राजकारण, भाजपाचा नथीतून तीर

CoronaVirus : शिवसेना-मनसेत कोरोना हॉस्पिटलवरुन राजकारण, भाजपाचा नथीतून तीर

googlenewsNext

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : कोरोना विषाणूमुळे राज्यात कल्याण डोंबिवली रेडझोनमध्ये आलेली आहे. दिवसेंदिवस येथील विशेषत: डोंबिवलीतील रुग्णांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण मिळवताना महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची तारेवरची कसरत सुरु आहे. मात्र, या संधीचा फायदा घेत येथील सत्ताधारी, विरोधकांमध्ये राजकारण सुरु झाले. कोविड १९ साठी डोंबिवलीतील आर.आर. हॉस्पिटल हे सर्व सुविधा नसतानाही केवळ मनसे आमदार राजू पाटील यांना १० लाख भाडे मिळणार असल्यानेच देण्यात आले असल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या हॉस्पिटलचा करारनामा देखील व्हायरल झाला आणि त्यामधून शिवसेना, मनसे या पक्षांमध्ये थेट सोशल वॉर सुरु झाला आहे.

आर.आर. हॉस्पिटल कोविडसाठी दिल्याने मनसेचे पारडे जड झाले असून न्यूऑन आधीच खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापालिकेसमवेत नियमांनुसार करार करून ते उपचारांसाठी वापरात देखील आणले असून तिथे रुग्णांना उपचार सुरु झाले आहेत. त्यामुळे या सगळयामध्ये भाजपा कुठेही चर्चेत नाही, आधीच राज्यात आणि त्या पाठोपाठ महापालिकेतही विरोधी बाकावर बसल्याने भाजपा कोरोनासारख्या आजारामध्ये कुठेही, कोणत्याही निर्णयात फ्रंट रोलमध्ये नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आर.आर. हॉस्पिटलला कोणतीही सुविधा नाही, असे संदेश पसरवून भाजपा मंडळींनी नथीतून तीर मारल्याचीही शक्यता असू शकते अशीही चर्चा सर्वत्र सुरु आहे.

एकीकडे आर.आर. हॉस्पिटलमध्ये कोणतीही सुविधा नाही असाही संदेश सोशल मीडियावर शुक्रवारी रात्री व्हायरल झाला आणि या सोशल वॉरला सुरवात झाली. आणि त्यानंतरच आर.आर. हॉस्पिटलला भाड्यापोटी मिळणा-या १०लाख रुपयांचा, त्यासाठी करण्यात आलेला करार वैगरे मुद्दा सगळीकडे चर्चेत आला. प्रत्यक्षात मात्र आयसीयू वगळता आर.आर. हॉस्पिटल हे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पूर्णपणे सुरु झाले आहे. आयसीयूचे काम देखिल अंतिम टप्प्यात असून त्या ठिकाणी असलेल्या वातानुकूलित यंत्रणेचे फिल्टर स्वच्छ करण्याचे काम सुरु असल्याची वस्तूस्थिती आहे.

आर.आर. हॉस्पिटलमध्ये तळमजल्यावर संशयित रुग्ण, पहिल्या मजल्यावर पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्याचे नियोजन सुरु असून हॉस्पिटलमध्ये पेशट्ंस अ‍ॅडमिट आहेत. कोविडी ओपीडी सुरु झाली असून इंडियन मेडिकल असोसिएशनची डोंबिवली शाखेतर्फे तेथील रुग्णांची निगा राखत आहेत. आयसीयू वॉर्ड मात्र सुरु झालेला नाही. तसेच तेथे काम करण्यासाठी आरएमओ (रेसिडन्स मेडिकल आॅफिसर), नर्स, वॉर्डबाय हे मुबलक प्रमाणात नाहीत. दिवसाला तीन शिप्ट असतात, त्याशिवाय आयएमएचे डॉक्टर दिवसरात्र काम करत आहेत. तेथे आयएमएचे २० तज्ञ कार्यरत असल्याची माहिती आयएमएचे हॉस्पिटल बोर्ड इंडियाच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. मंगेश पाटे यांनी दिली.

कोरोना रोखण्यासाठी आयएमए डॉक्टरांनी काम करावे, कोणीही कसल्याची राजकारणात पडू नये असे आवाहन देखील पाटे यांनी केले आहे. परंतू तेथे कार्यरत असणा-या डॉक्टरांनाही ज्या आवश्यक असणा-या हेल्थ किट आहेत. त्यासह अन्य सुविधांची मात्र कमतरता असून त्याची पुर्तता तातडीने होणे गरजेचे असल्याचे पाटे म्हणाले.

- मला या सगळयाबाबत अजिबात वेळ नाही. कोण राजकारण करत असेल तर ते योग्य नाही. कोराना सारख्या जीवघेण्या आजारामधून कल्याण डोंबिवलीला रेडझोनमधून बाहेर कस काढायच याकडेच माझे लक्ष आहे. पहिल्या दिवसापासून त्यासाठीच मी अहोरात्र झटत आहे. - डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार

- २४ मार्च रोजी आयुक्तांना भेटलो, तेव्हाच ४ हॉस्पिटल ताब्यात घेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत डोंबिवलीतील पेशंटची वाताहात होऊ नये असा हेतू होता. त्यात जो करार सगळया हॉस्पिटल संदर्भात झाला तोच माझ्यासाठी लागू झाला. मग केवळ आर.आर. हॉस्पिटलच करार झाला आहे. तो व्हायरल करण्याचा शिवसेनेचा हेतू चांगला आहे का? अजून ते भाड्यापोटी १० लाख रुपये आले पण नाही, ते आल्यावर मी काय करायचे ते बघणारच आहे. त्यातच शिवसेनेचा कार्यकर्ता असणारे पेशंट मध्यरात्री आर.आर. हॉस्पिटलला येतात, तिथल्याच गैरसोयीच पोस्ट व्हायरल होते, आणि एकदम ते पुन्हा न्यूआॅन हॉस्पिटलला शिफ्ट होतात हे राजकारण केवळ आमची बदनामी करण्यासाठी शिवसेना करत आहे का? भाजपा देखिल त्यात मागे नसावी असे दिसून येत आहे. - प्रमोद(राजू) पाटील, आमदार,मनसे

-  कोरोन आजारावर सगळयांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यासाठीच ५ कोटी रुपये जे सुतिकागृहासाठी तत्कालीन सरकारकडून आणले होते. तो निधी महापालिकेकडे असून तातडीने ६७ क प्रमाणे वापरावे हे पत्र मी आमदार म्हणुन आयुक्त विजय सुर्यवंशी यांना दिले आहे. त्यातून महापालिकेची रुग्णालय अद्यायावत करावीत. तसेच जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करून तो आणण्यासाठी आयुक्तांना पुढे यावे, त्यासाठी जो पाठपुरावा करावा लागेल तो सगळा मी करेन - रवींद्र चव्हाण, आमदार

- गेले २० वर्षे येथे शिवसेना भाजपची सत्ता आहे, त्यांनी सुमारे २५ हजार कोटींचे अर्थसंकल्प आतापर्यंय दिले. त्यांना साध १०० कोटींचे दोन हॉस्पिटल या ठिकाणी देता येऊ नये ही सत्ताधा-यांची शोकांतिका आहे. आमच्या आमदाराने क्षणार्धात कसलाही विचार न करता आर आर हॉस्पिटल दिले, त्यासाठी जर १० लाख भाड्यापोटी मिळणार असतील तर त्याची एवढी बोंबाबोंब करण्याची गरजच काय? दोन पोती तांदुळ देऊन फोटो व्हायरल करणा-यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये - संदेश प्रभुदेसाई, महाराष्ट्र उपाध्यक्ष, जनहित कक्ष, मनसे

Web Title: CoronaVirus: Politics from Shiv Sena-MNS on Corona Hospital in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.