Coronavirus News: Coronavirus infected 39 policemen including two officers in Thane Commissionerate in a single day | Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात एकाच दिवसात दोन अधिकाऱ्यांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण

महिला पोलीस उपायुक्तांनीही केली कोरोनावर मात

ठळक मुद्देमुख्यालयातील सहा महिला पोलिसांचा समावेशसात पोलिसांवर घरीच उपचार सुरुमहिला पोलीस उपायुक्तांनीही केली कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दिवसेंदिवस ठाणे शहर पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. बुधवारी एकाच दिवसात दोन उपनिरीक्षकांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. आतापर्यंत इतक्या मोठया प्रमाणात प्रथमच एकाचवेळी ३९ पोलीस बाधित झाले आहेत. यामध्ये मुख्यालयातील सर्वाधिक १३ पोलिसांचा समावेश आहे. आतापर्यंत उपायुक्तांसह ३६९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ जून रोजी कासारवडवली पोलीस ठाण्याचे आणि राज्य राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षकांना कोरोनाची लागण झाली. या दोघांनाही भार्इंदर पाडा येथील उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर मुख्यालयातील सात महिलांसह १३ पोलीस कर्मचाºयांनाही लागण झाली. या सर्वांवर भिवंडी, शहापूर, नवी मुंबई, भार्इंदर पाडा आणि उल्हासनगर अशा वेगवेगळया रुग्णालयांध्ये उपचार सुरु आहेत. याव्यतिरिक्त मोटार परिवहन विभागातील सहा चालक तसेच राज्य राखीव पोलीस दलातील पाच जवानांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राबोडी, भिवंडी नियंत्रण कक्ष आणि बदलापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोघे बाधित झाले आहेत. याशिवाय, कळवा, कोनगाव, मानपाडा, मध्यवर्ती, उल्हासनगर आणि कापूरबावडी येथील प्रत्येकी एका कर्मचा-याला लागण झाली आहे. यातील काही पोलिसांचे कुटूंबीय देखिल बाधित झाल्यामुळे चिंतेमध्ये आणखीनच भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे सौम्य किंवा अजिबात लक्षणे नसणाºया पोलिसांवर घरीच उपचाराचा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे. त्यानुसार राबोडी, कळवा आणि उल्हासनगर येथील सात पोलिसांवर घरी उपचार करण्यात येत आहेत.
* आतापर्यंत ५९ अधिकाºयांसह ४९९ कर्मचारी अशा ५५८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली. त्यातील ३५ अधिकारी आणि ३३४ कर्मचारी अशा ३६९ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. तर तिघांचा यामध्ये मृत्यु ओढवला आहे. सध्या ५८ पोलिसांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर दोघांना केंद्रामध्ये कॉरंटाईन करण्यात आले आहे.
...........................
* महिला आयपीएस अधिका-याचा अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे पोलिसांना दिलासा
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी काही सामाजिक संस्थांच्या मदतीने २६ जूनपासून आयुक्तालयातील अधिकारी कर्मचा-यांची मोफत आरोग्य तपासणी सुरू केली आहे. अशा नऊ हजार पोलिसांची तपासणी होणार आहे. सौम्य लक्षणे असणाºया १०० पेक्षा अधिक पोलिसांची आतापर्यंत तपासणी झाली. यामध्ये एका आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस उपायुक्तांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर अवघ्या पाचच दिवसांमध्ये मुंबईमध्ये केलेल्या तपासणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. अर्थात, तरीही या महिला अधिका-यांना १४ दिवसांसाठी गर्दीत न मिसळण्याबरोबर विश्रांती घेण्याचाही सल्ला वैद्यकीय अधिका-यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Coronavirus News: Coronavirus infected 39 policemen including two officers in Thane Commissionerate in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.