शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कर्त्या पुरुषाचा बळी गेल्याने मोठी समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:42 IST

CoronaVirus Thane News: शहीद पोलिसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. परंतु, ही मदत तत्परतेने कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना कमावत्या पुरुषाच्या पश्चात घरखर्च कसा चालवायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावात आतापर्यंत पाच पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहीद पोलिसांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये मदत देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. परंतु, ही मदत तत्परतेने कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना कमावत्या पुरुषाच्या पश्चात घरखर्च कसा चालवायचा, असा यक्षप्रश्न पडला आहे.डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक संतोष कळमकर (वय ५१) यांचा आॅगस्टमध्ये कोरोनाने मृत्यू झाला, परंतु या घटनेला महिना उलटूनही सरकारी मदत त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचलेली नाही. स्थानिक पोलिसांनी केलेल्या मदतीवर आतापर्यंत दिवस गेले, परंतु पुढील घरखर्च कसा भागवायचा, या विवंचनेत हे कुटुंब आहे. हेमंत करकरे आणि वाय.सी. पवार यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांबरोबर सेवा बजावलेले संतोष हे पाच वर्षांपासून रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. कल्याण पूर्वेकडील तीसगावनाका परिसरातील विघ्नहर्ता पार्कमध्ये ते वास्तव्याला होते. २२ जुलैला कळमकरांना ताप आला. दुसºया दिवशी त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यात त्यांना लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, त्यांना सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना घरीच क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला होता, परंतु कुटुंबाला संसर्ग होऊ नये, या काळजीपोटी कळमकरांनी निआॅन रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणे पसंत केले. चार ते पाच दिवस त्यांची प्रकृती बरी होती. मात्र, त्यानंतर प्रकृती गंभीर बनली. अखेर, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १७ आॅगस्टला उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.कोरोनामुळे मुलींना नोकरी मिळणे झाले दुरापास्तसंतोष कळमकर यांच्यापश्चात पत्नी श्वेता आणि सुपर्णा, ऐश्वर्या अशा दोन मुली आहेत. दोन्ही मुलींनी पदवीचे शिक्षण घेतले आहे. कळमकर हे घरात एकटेच कमावते होते.सुपर्णा सध्या नोकरीच्या शोधात आहे, परंतु तेही शक्य होत नाही. अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात रुजू होण्याचा निर्णय तिने घेतला आहे, परंतु भरती प्रक्रिया थांबल्याने तेही शक्य नाही.वडिलांच्या उपचारासाठी तत्काळ आर्थिक मदत मिळाली, परंतु मृत्यूनंतरची मदत मिळालेली नाही. आईला निवृत्तीवेतनही चालू झालेले नाही. रामनगर पोलिसांनी सहकार्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या