शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ नवे रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 9:38 PM

CoronaVirus News : ठाणे शहरात १७६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या ५१ हजार १५५ नोंदली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आता दोन लाख २८ हजार ५८८ रुग्णांची नोंद झाली.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ रुग्ण रविवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख २८ हजार ५८८ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ६७७ नोंदल्या गेली आहे.  

ठाणे शहरात १७६ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या ५१ हजार १५५ नोंदली आहे. शहरात तीन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्याही एक हजार २३१ झाली. कल्याण - डोंबिवलीत १९७ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले आहे. आता ५३ हजार ९५७ रुग्ण बाधीत असून एक हजार ५९ मृत्यूची नोंंद झाली आहे. 

उल्हासनगरमध्ये ४२ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या दहा हजार ८२१ झाली. तर, ३५३ मृतांची आहे. भिवंडीला ११ बधीत आढळून आले असून एकही मृत्यू झाला नाही. आता बाधीत सहा हजार २७४ असून मृतांची संख्या ३४५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ४७ रुग्णांची तर, एकाही मृत्यूची नोंद नाही. या शहरात  बाधितांची संख्या २४ हजार १३२ असून मृतांची संख्या ७५६ नोंदली आहे.

अंबरनाथमध्ये २१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत सात हजार ८५९ असून मृत्यू २८८ नोंदले आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत आठ हजार ४४ झाले आहेत. या शहरात आजही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या ९८ कायम आहे. ग्रामीणमध्ये ६८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचाही मृत्यू नाही. आता बाधीत १८ हजार १६९ आणि आतापर्यंत ५६५ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस