शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

घरात थांबलो तर खायचं काय?; उपासमारीची वेळ आलेल्या नाका कामगारांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:47 IST

उल्हासनगरातील ५० हजार नाका कामगारांची अवस्था बिकट

उल्हासनगर : नाका कामगार व मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांना शिधा वाटप दुकानातून मोफत धान्य वाटप करा, अशी  मागणी कामगार नेते राधाकृष्ण साठे व शहर मनसेने थेट मुखमंत्री उद्धव ठाकरेंकडे निवेदनाद्वारे केली.उल्हासनगरात लहान व मोठे अनेक उधोग असून त्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 हजारांपेक्षा जास्त आहे. कर्फ्यूमुळे त्यांच्या कामावर गदा येऊन त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ आली. हाताला काम नसल्याने दोन वेळ खायचे काय? असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला असून त्यांच्यासह कुटुंबाची उपासमार सुरू झाली. अशांना मदतीचा हात देण्याची तयारी विविध सामाजिक संस्थेने महापालिका आयुक्त देशमुख यांना बोलून दाखवली. मात्र कोनोरा संसर्गाच्या भीतीने आयुक्ताने निर्णय घेण्यास वेळ मागितला आहे. दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी अशा गरीब व गरजू कुटुंबाना शिधा वाटप दुकानातून मोफत अन्नधान्य देण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.नाका कामगारासह मोलमजुरी करणाऱ्या कामगारांची उपासमार होत असून त्यांना शासनासह सामाजिक संस्थेने वेळीच मदतीचा हात पुढे केला नाहीतर, महामारी पसरण्याची भीती कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी व्यक्त केली. शासन मदत करीत नसेलतर सामाजिक संस्थेना मदतीचा हात देण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने द्यावी. अशी मागणी साठे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. येत्या दोन दिवसात त्यांचा खाण्याचा प्रश्न निकाली निघाला नाहीतर, शहरात वेगळीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस