CoronaVirus Marathi News Jitendra Awhad donate plasma in thane | CoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन

CoronaVirus News : जितेंद्र आव्हाडांनी वाढदिवशी केलं प्लाझ्मादान, कोरोनामुक्त रुग्णांना केलं 'हे' आवाहन

ठाणे - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण रुग्णांची संख्या ही तब्बल 19 लाखांवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील वाढत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या साडे चार लाखांहून अधिक झाली आहे. याच दरम्यान अनेक नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे. जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल असं आवाहन देखील आव्हाड यांनी यावेळी केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करू नये. ठाणे शहरात कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्ज लावू नये; त्याऐवजी कोविडयोद्धे आणि गोरगरीब जनतेसाठी लाभदायक उपक्रम राबवा, असे आवाहन आव्हाड यांनी केले होते. त्यानुसार, कार्यकर्त्यांनीही ठिकठिकाणी अन्नधान्यवाटप, सॅनिटायझर, मास्कवाटप असे उपक्रम राबविले. ठाणे-मुंबईमध्ये सहा ठिकाणीच प्लाझ्मा संकलन करण्यात येत होते. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनीदेखील प्लाझ्मादान केले आहे.

मुंबईमध्ये चार आणि नवी मुंबई, नालासोपाऱ्यात प्रत्येकी एका ठिकाणी हे संकलन करण्यात येत होते. परिणामी, वाहतुकीच्या समस्येमुळे ठाण्यातील रुग्णांना त्याचा लाभ घेणे जिकिरीचे होत होते. मात्र, आता ही समस्या निकाली निघाली आहे. ठाणे शहरातील ब्लडलाईन या रक्तपेढीला ही परवानगी मिळाली आहे. या रक्तपेढीमध्ये एकावेळी तीन जणांचे प्लाझ्मा संकलन करणे शक्य होणार असून किमान 100 जणांचे प्लाझ्मा साठवणे शक्य होणार आहे, अशी माहिती डॉ. शिल्पा जैन यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बापरे! कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका व्हायरसचा धोका; 7 लोकांचा मृत्यू, 60 जणांना लागण

CoronaVirus News : कोरोनाचा धडकी भरवणारा वेग! जगभरात दर 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू

धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, दु:खी झालेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट

Web Title: CoronaVirus Marathi News Jitendra Awhad donate plasma in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.