Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 02:36 PM2020-08-05T14:36:05+5:302020-08-05T14:40:48+5:30

Ram Mandir Bhoomi Pujan : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. 

Lata Mangeshkar tweet on Ram Mandir Bhoomi Pujan | Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

googlenewsNext

नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन झालं. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोहळ्यासाठी अतिशय मोजक्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. 

लतादीदींनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन दोन नेत्यांना राम मंदिर निर्माणाचं श्रेय दिलं आहे. 'अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणींचं आहे. कारण त्यांनी या मुद्द्यावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण भारतात जनजागृती केली होती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा श्रेय आहे" असं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. 

"नमस्कार. अनेक राजांचं, अनेक पिढ्यांचं आणि संपूर्ण विश्वातील राम भक्तांचं अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे. अनेक वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत आज प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण होत आहे, शीलान्यास होत आहे. मंदिर निर्माणाचं सर्वांत मोठं श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणींचं आहे. कारण त्यांनी या मुद्द्यावरून रथयात्रा सुरू करून संपूर्ण भारतात जनजागृती केली होती आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचंसुद्धा श्रेय आहे. आज भूमिपूजनाचं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राम जन्मभूमी न्यास अध्यक्ष नृत्य गोपाल दासजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक मान्यवर या भूमिपूजनाला उपस्थित राहतील. कोरोनामुळे लाखो रामभक्त तिथे पोहोचू शकले नसले तरी त्यांचं मन श्रीराम यांच्या चरणीच लीन असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचा मला खूप आनंद आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण विश्व खूप खूश आहे. जणू प्रत्येक श्वास आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यातून जय श्री राम हा उच्चार होत आहे" असं ट्विट लतादीदींनी केलं आहे. 

अयोध्येत पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी भूमिपूजन केलं. त्यांनी एकूण 9 शिळांचं पूजन केलं. यावेळी कूर्म शिळा मध्यभागी ठेवण्यात आली होती. याच शिळेवर रामलला विराजमान होणार आहेत. जय श्रीराम आणि हर-हर महादेवच्या जयघोषात शिलान्यासाचा कार्यक्रम संपन्न झाला. 12 वाजून 44 मिनिटांनी भूमिपूजन सोहळा पार पडला.

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट

Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका

Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

Web Title: Lata Mangeshkar tweet on Ram Mandir Bhoomi Pujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.