ram mandir bhumi pujan pm modi will address the country for one hour | Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

नवी दिल्ली - राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजले आहे. परिसर सुशोभित करण्यात आला असून संपूर्ण अयोध्या नगरी विद्युत दिव्यांच्या रोषणाईने झळाळून उठली आहे. जागोजागी प्रभू रामचंद्राच्या प्रतिमा असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 5 ऑगस्ट रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.

कोरोनाच्या सावटाखाली होत असलेला हा भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थिती होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. नरेंद्र मोदी राम मंदिराच्या  भूमिपूजनानंतर देशाला संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधानांचा अयोध्येतील 'मिनिट टू मिनिट' कार्यक्रम नेमका कसा असणार हे जाणून घेऊया. 

असा असणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संपूर्ण कार्यक्रम

- 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9.35 वाजता दिल्लीहून प्रस्थान

- 10.35 वाजता लखनऊ विमानतळावर लॅडिंग

- 10.40 हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना होणार

- 11.30 वाजता अयोध्याच्या साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर लॅंडिंग

- 11.40 वाजता हनुमानगढी येथे पोहचणार त्यानंतर 10 मिनिटे दर्शन आणि पूजा

- 12 वाजता राज जन्मभूमी परिसरात पोहचणार

- रामलल्लांचे दर्शन आणि पूजा

-12.15 वाजता रामलाला परिसरात पारिजातचे वृक्षारोपण

-12.30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात

-12.40 वाजता राम मंदिर आधारशिलाची स्थापना

- 2.05 वाजता साकेत कॉलेजच्या हेलिपॅडकडे प्रस्थान

- 2.20 वाजता लखनऊमधून हेलिकॉप्टरने प्रस्थान

- लखनऊवरून दिल्लीसाठी रवाना होणार

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे निमंत्रण पत्रिका पाठवत आहेत. या निमंत्रण पत्रिकेत श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन आणि कार्यारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित असतील असं म्हटलं आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी खटल्यात मुस्लिम पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनाही या भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. श्रीरामाच्या इच्छेमुळेच मला या सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain Updates : घरीच थांबा! अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन

CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा

Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या...

Sushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण

Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल

CoronaVirus News : धक्कादायक! टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ

Video - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला भारताचा झेंडा

 

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ram mandir bhumi pujan pm modi will address the country for one hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.