sushant singh rajput case bmc clarification on vinay tiwari quarantine | Sushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण

Sushant Singh Rajput Case: ...म्हणून बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना केलं क्वारंटाईन, BMCने सांगितलं नेमकं कारण

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी तपासासाठी मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMC ने केलं क्वारंटाईन केल्याची घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांना क्वारंटाईन केल्यानंतर अनेकांनी पालिका आणि पोलिसांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. मात्र बिहारच्या IPS अधिकाऱ्यांना क्वारंटाईन का केलं यामागचं नेमकं कारण आता पालिकेने सांगितलं आहे. BMC ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. 

सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी आणि बिहार शहर पूर्वचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेने त्यांना क्वारंटाईन केलं आहे. बिहार पोलिसांनी तिवारी यांना जबरदस्तीने क्वारंटाईन केल्याचा आरोप केला आहे. मात्र यावर आता मुंबई महापालिकेने विनय तिवारी यांचे क्वारंटाईन योग्यच असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच राज्य सरकारच्या नियमावलींचा हवाला देखील दिला आहे.

बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे बिहारमधून आले होते. मुंबईच्या गोरेगाव पूर्वमधील राज्य राखीव पोलीस दलाच्या विश्रामगृहात ते थांबले होते. त्याची माहिती पालिकेच्या पी/दक्षिण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या अधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर जाऊन त्यांना क्वॉरंटाईन केले. तिवारी हे देशांतर्गत प्रवासी असल्याने राज्य शासनाच्या नियमावलीनुसार त्यांना होम क्वॉरंटाईन करणे आवश्यक होते. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली असल्याचं पालिकेने म्हटलं आहे. 

महापालिकेच्या पथकाने बिहार येथून आलेल्या या अधिकाऱ्यांना देशांतर्गत प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी लागू असलेली होम क्वॉरंटाईनची प्रक्रिया सांगण्यात आली. त्यांना राज्य शासनाचे दिनांक 25 मे 2020 रोजीचे आदेश क्रमांक डिएमयू/2020/सीआर 92/डिएसएम 1 अन्वये देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्याची नियमावली दाखवण्यात आली आणि त्यानुसार त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच राज्य शासनाच्या नियमावलीनुसार, क्वारंटाईनमध्ये सूट मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकाऱ्याकडे नियमावलीनुसार अर्ज केल्यास सूट मिळेल अशी माहितीही देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2020: रोहित पवारांचं अनोखं रक्षाबंधन, कोरोना वॉरिअर्स बहिणींची घेतली खास भेट

Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल

CoronaVirus News : धक्कादायक! टेस्ट केल्यानंतर 'या' शहरात गायब झाले 2290 कोरोना पॉझिटिव्ह, परिसरात खळबळ

Video - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला भारताचा झेंडा

Sushant Singh Rajput Case: मुंबईत आलेल्या IPS अधिकाऱ्याला BMCने जबरदस्तीने केलं क्वारंटाईन, बिहार पोलिसांचा आरोप

CoronaVirus News : धोका वाढला! राज्यात 9,509 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 4 लाखांवर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sushant singh rajput case bmc clarification on vinay tiwari quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.