lady with her three children ate poison due to depression | धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, दु:खी झालेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, दु:खी झालेल्या पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 19 लाखांचा टप्पा पार केला आहे. दिवसागणिक परिस्थिती गंभीर होत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काहींच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाचा बळी ठरला आहे. तर काहींचं संपूर्ण कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त केलं आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर दु:खी झालेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. नैनीतालच्या हल्द्वानीमध्ये ही घटना घडली. पतीच्या मुत्यूनंतर पत्नीने आपल्या तिन्ही मुलींसह विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर चारही जणींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपला पती आणि तीन मुलींसह हल्द्वानीमध्ये राहते. मात्र काही दिवसांपूर्वी तिच्या पतीला कोरोनाची लागण झाली आणि त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे ती खूप दु:खी झाली होती. तिने आपल्या तिन्ही मुलींसह स्वत: ही विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी लगेचच महिलेसह तिच्या तिन्ही मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. महिलेच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने काही दिवस तिचं कुटुंब हे क्वारंटाईन होतं. त्याचं दरम्यान तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या या चार ही जणींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ram Mandir Bhoomi Pujan : लतादीदींनी 'या' दोन नेत्यांना दिलं राम मंदिर निर्माणाचं श्रेय, व्यक्त केला आनंद

Ram Mandir Bhumi Pujan : अयोध्येच्या व्यासपीठावरून मोदींनी करावी 'ही' घोषणा, भाजपा नेत्याची मागणी

Ram Mandir Bhumi Pujan : "राम सगळ्यांचा असण्यातच 'राम' आहे, विचार घेऊन माणुसकीचा सेतू बांधूया"

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिर भूमिपूजनाची आठवण म्हणून निमंत्रिताना मिळणार 'ही' खास भेट

Mumbai Rain Updates : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; रस्ते वाहतुकीला फटका

Ram Mandir Bhumi Pujan : "आजचा दिवस ऐतिहासिक, राम मंदिरामुळे देशात 'रामराज्य' येणार"

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: lady with her three children ate poison due to depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.