शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: विकेण्ड लॉकडाऊनमध्ये पार्सलला मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 23:51 IST

परीक्षार्थींना अत्यावश्यक प्रवासाला तर हॉटेलमधून आणि खाद्यपदार्थ गाडीवरून घरी पार्सल नेण्यासंदर्भात मुभा

ठाणे :  विकेण्ड लॉकडाऊनमध्ये ठाणे महापालिका प्रशासनाने काही मुभा दिल्या आहेत. यामध्ये परीक्षार्थींना अत्यावश्यक प्रवासाला तर हॉटेलमधून आणि खाद्यपदार्थ गाडीवरून घरी पार्सल नेण्यासंदर्भात मुभा दिली आहे. हे आदेश ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार असल्याचे ठाणे महापालिकेने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. हे परिपत्रक अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी काढले असून आदेशाला विरोध करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट म्हटले आहे. ७ एप्रिल २०२१ रोजी महापालिकेने हे परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या विद्यार्थ्यांना / परीक्षार्थीना, स्पर्धा परीक्षांसह अन्य परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहवयाचे आहे, अशा परीक्षार्थींना या कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्याची मुभा आहे. तसेच संबंधित परीक्षार्थी यांच्याकडील हॉल तिकीट हा प्रवासाकरीताचा वैध आवश्यक पुरावा म्हणून मानला जाईल. ऑनलाइन डिलिव्हरी देणाऱ्या अन्नपुरवठा करणाऱ्या आणि अत्यावश्यक सेवेतील अन्न पुरवठाधारक इत्यादींसाठी आठवड्यातील सर्व दिवस २४ तास सेवा पुरविण्याची मुभा असेल, असे पत्रकात नमूद केले आहे.फळविक्रेत्यांसह रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्री स्टॉल सुरू ठेवता येतील. परंतु, केवळ पार्सल सेवा किंवा खाद्यपदार्थ घरी घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. तर डोळ्यांचे सर्व दवाखाने आणि चष्म्याची दुकाने या कालावधीत सुरू राहणार आहे. त्यामुळे संबंधितांनी अंमलबजावणी करावी. ती करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या