शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: खोपट एसटी डेपो अखेर सील, वाहतुकीवर परिणामाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 02:04 IST

सार्वजनिक उपक्रमातील बससेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी खोपट एसटी बस डेपो क्रमांक १ येथून या सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती.

ठाणे : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) ठाण्यातील वाहन परीक्षकांसह चालक व वाहक अशा ४३ कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खोपट येथील एसटी डेपो क्रमांक १ हा सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ७ व ८ जुलै रोजी तो बंद राहणार असून या काळात तेथे निर्जंतुकीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सार्वजनिक उपक्रमातील बससेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी खोपट एसटी बस डेपो क्रमांक १ येथून या सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. यातूनच अनेक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. डेपोतील विश्रांती कक्षातील अपुºया जागेमुळे सामाजिक अंतराचे पालन होणेही शक्य नव्हते. त्यामुळेच डेपो बंद ठेवून निर्जंतुकीकरण करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार डेपो बंद ठेवण्यात येणार आहे.खोपट डेपोमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, दादर, मंत्रालय सीएसटी या भागांतील रुग्णालय व इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये जाणाºया प्रवाशांसाठी सेवा देण्याचे काम करीत आहे. आता या कर्मचाºयांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हा डेपो सील करण्याची मागणी कर्मचाºयांनी करूनही एसटीकडून ठोस पावले उचलण्यात आली नाही. ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी तो सील करण्याचे आदेश दिले.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी या डेपोतून प्रतिदिन सकाळी ४० तर दुपारी ४० अशा ८० बस सोडण्यात येत होत्या. या कर्मचाºयांची गैरसोय टाळण्यासाठी खोपट बस डेपो क्र मांक दोन आणि इतर ठिकाणांहून किमान ४० बस सोडण्यावर भर देण्यात येणार आहे.- विनोद भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी

टॅग्स :state transportएसटीthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस