शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : त्यांची गाडी दिसली की उपाशीपोटी असलेल्यांच्या चेहऱ्यावर फुलतो आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:38 IST

राज्यात आणि आत्ता देशाभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे निराधार 

कल्याण-कोरोनाशी दोन हात करुन त्याला पिटाळून लावण्यासाठी आधी राज्यात आणि आत्ता देशाभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र जे लोक निराधार  आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून कल्याणमध्ये फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे. त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नसून भुकेल्यांसाठी त्यांची गाडी फिरतेय. त्यांची गाडी दिसली की निराधारांच्या चेह:यावर आनंद फुलतो. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता काही एक सुरु नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेच्या वतीने फूड पॅकेटची गाडी गेल्या तीन दिवसापासून शहरात फिरते आहे. सोमवारी या गाडीतून 1 हजार जणांना फूड पॅकेट वाटप करण्यात आले आहे. काल मंगळवारी व आज बुधवारी ही फूड पॅकेट वाटप केले गेले. बेघर, हातावर पोट असलेले नाका कामगार यांना अन्नाचे वाटप केले जात आहे. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेले सरकारी कर्मचारी यांनाही जेवण दिले जात आहे. कल्याणच्या रेतीबंदर, बस स्टँड, स्टेशन परिसर, पोलिस, आरपीएफचे जवान, रुक्मीणीबाई रुग्णालय याठिकाणी फूट पॅकेटचे वाटप केले गेले. हे काम शिवसेना नगरसेवक सचिन बासरे व शिवसैनिक वंडार कारभारी, सशांक भोईर, जयेश लोखंडे, योगेश पष्टे, बाळा भोईर ही मंडळी करीत आहेत. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनानुसार सगळे लाेक घरात बसलेले असताना ही मंडळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता भुकेल्यांना अन्न वाटप करीत फिरत आहेत. त्यांच्या या कामाचे सगळीकडे कौतूक होत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणfoodअन्न