शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

coronavirus: भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवेने नागपूरहून ठाण्यात २४ तासांच्या आत पोहोचवले व्हेंटिलेटर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 7:54 PM

मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमता एकत्रित  करून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे.

ठाणे - मध्य रेल्वे आणि भारतीय टपाल सेवेची संयुक्त सेवा असलेली भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा ही सुरूवातीपासून  शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी देण्यासाठी असून दोन व्हेंटिलेटर नागपूरहून मुंबईला नेण्यात आल्यामुळे आणखी एक विक्रम झाला आहे. यामध्ये डोर टू डोर सर्व्हिस २४ तासांच्या आत पूर्ण केली गेली.नागपुरातील एक खाजगी संगणक कंपनी  ज्यांनी, अथ ते इथपर्यंत असलेल्या म्हणजेच  सुरूवातीपासून  शेवटपर्यंत  कनेक्टिव्हिटी देणा-या या सेवेचा ठाण्यातील प्रादेशिक मनोरूग्णालयात २ व्हेंटिलेटर्स पाठविण्यासाठी लाभ घेतला,  त्यांना     प्रभावित केले  आणि ही सेवा खूप छान आहे असे त्यांना पटवून दिले गेले.  कोरोना व्हायरस महासाथीच्या वेळी वेंटीलेटर्सचे महत्त्व लक्षात घेता हे पार्सल ८.६.२०२० रोजी बजाजनगर, नागपूर येथून घेण्यात आले आणि २४ तासात ठाणे येथील मनोरूग्णालयामध्ये ९.६.२०२० रोजी पोहोचविण्यात आले.  यामध्ये  १३४ किलो वजनाच्या ६ पॅकेट्सचा समावेश होता आणि उत्पन्न फारसे नव्हते, परंतु डोर टू डोअर सर्व्हिस ही एक गोष्ट असामान्य आणि विशेष बाब  होती.  श्री शेखर बालेकर, मुख्य पार्सल पर्यवेक्षक, नागपूर यांनी ही  उपकरणे पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.

 कोविड-१९ लॉकडाऊनच्या सद्यस्थितीत, व्यक्ती आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना त्यांची आवश्यक आणि  मोठ्या आकाराच्या वस्तू असलेला इतर माल पाठविणे कठीण जात आहे.  मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या लक्षात घेता मध्य रेल्वे आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमता एकत्रित  करून भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा उपलब्ध करून दिली आहे.  ही सेवा मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांमध्ये आणि दरम्यान उपलब्ध आहे.  भारतीय टपाल सेवा ग्राहकांच्या आवारातून वस्तू घेते आणि मध्य रेल्वे आणि टपाल मेल मोटर सेवा द्वारे चालविल्या जाणा-या खास पार्सल गाड्यांच्या माध्यमातून गंतव्यस्थानावरील वस्तू पोहोचवित आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेcentral railwayमध्य रेल्वे