शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

coronavirus: मृतदेह अदलाबदली प्रकरण : ठाण्यातील रुग्णालय अधिष्ठातांची उचलबांगडी, चार परिचारिका निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 11:42 PM

कोरोना रुग्णांच्या मृतदेह अदलाबदलप्रकरणी कोविड रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा यांची बदली करून चार परिचारिकांना निलंबित केले आहे. याशिवाय, यापुढे ओळख पटवूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हब रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृतदेह अदलाबदलप्रकरणी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोनावणे आणि गायकवाड कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली. याप्रकरणी कोविड रुग्णालयाचे डॉ. योगेश शर्मा यांची बदली करून चार परिचारिकांना निलंबित केले आहे. याशिवाय, यापुढे ओळख पटवूनच मृतदेह ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शर्मा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या संपूर्ण एक आठवड्यापासून सुरू असलेल्या मृतदेह अदलाबदल प्रकरणावर महापालिका तसेच राजकीय वर्तुळातून टीकेची झोड उठविण्यात आली. राज्यपाल डॉ. भगतसिंह कोश्यारी यांनीही याप्रकरणी कारवाईचे संकेत भाजपसह सोनावणे आणि गायकवाड कुटुंबीयांना गुरुवारी दिले.त्यापाठोपाठ, आयुक्तांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून दिलगिरी व्यक्त करण्याबरोबरच वैद्यकीयदृष्ट्या पालिकेची कोणतीही चूक नसल्याचीही सारवासारव केली. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकार घडल्यामुळे संबंधितांवर आपण कारवाई करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानुसार, अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा यांची अन्यत्र बदली केली असून त्यांच्या जागी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांना नेमले आहे. यापुढे मात्र, आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून रुग्ण व्यवस्थापनामध्ये कोणतीही चूक होणार नाही, याची पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाणार आहे.रुग्णाच्या फाईलवर त्याचे छायाचित्र लावणारकोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या फाइलवर दर्शनी भागात त्याचे छायाचित्र लावले जाणार आहे. तसेच डिजिटल हॅण्डबॅण्ड प्रक्रियादेखील सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उपचार करताना किंवा दुर्दैवाने मृत्यू झालाच, तर अदलाबदलीसारखे प्रकार होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.मृत्यूदर कमी करण्यावर भरऔषधांबरोबर काही इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे बोलले जात असल्याबाबतच्या प्रश्नावर आयुक्त डॉ. शर्मा म्हणाले, सध्या तरी पुरेसा औषधांचा साठा आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये अत्याधुनिक यंत्रणेद्वारे घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. यात नागरिकांचा ताप, आॅक्सिजनचे प्रमाणही तपासले जात असल्यामुळे त्याचा चांगला परिणाम जाणवू लागला असल्याचे त्यांनी सांगितले.जास्तीतजास्त तपासण्या करून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी समोर येत असली, तरी रुग्ण बरे करण्यावर आणि मृत्युदर कमी करण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी पालिका आयुक्तांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी, कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीवर्ग मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काही आकडेवारी सादर करूनमहापालिकेने कोविड रुग्णांसाठी तसेच रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या कामाचीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर