शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

coronavirus: ढिसाळ कारभाराचा ठाण्यातील आणखी एका रुग्णाला फटका, बाधिताच्या पत्नीला क्वारंटाइन केलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 02:07 IST

कळवा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी भागांतील नागरिकांना बसला असतानाच आता कोरोनाबाधित रुग्णांनादेखील तो बसत आहे.

ठाणे : घोडबंदर भागातील मानपाडा गावातील बोर्डाच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण होऊनदेखील त्याला एक दिवस घरी थांबण्याचा सल्ला लॅबने दिला. परंतु, दक्ष नागरिकांच्या सतर्कतेमुळे या रुग्णाला अखेर रविवारी रात्री दीडच्या सुमारास रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु, तोपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या त्याची पत्नी आणि घरातील इतर मंडळींना महापालिकेने अद्यापही क्वारंटाइन केले नसल्याची बाबही समोर आली आहे.एकीकडे कळवा रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराचा फटका लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, मुंब्रा आदी भागांतील नागरिकांना बसला असतानाच आता कोरोनाबाधित रुग्णांनादेखील तो बसत आहे. मानपाडा गावातील या सुरक्षारक्षकाला काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यामुळे त्याने महापालिकेने मान्यताप्राप्त केलेल्या खाजगी लॅबकडून कोरोनाचाचणी केली. त्यानंतर, रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास त्याच्या मेलवर रिपोर्ट आला. त्यामुळे तो पॉझिटिव्ह आल्याने पुढे काय करायचे, कुठे जायचे, असा प्रश्न त्याला पडला होता. त्यामुळे रात्री ९ च्या सुमारास त्याने संबंधित लॅबला फोन केला. परंतु, सर नसल्याचे त्याला सांगण्यात आले. रात्र घरीच काढा, असाही निरोप त्याला दिला गेला. मात्र, त्याची प्रकृती जास्त खालावत जात होती. खोकला, ताप, सर्दी यामुळे तो हैराण झाला होता. त्यात असे उत्तर मिळाल्याने तो आणखीनच चक्रावून गेला. अखेर, भावाच्या आणि मित्रांच्या मदतीने महापालिकेशी संपर्क साधून रात्री दीडच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल केले.संपर्कात आलेल्या पत्नीलाही आता त्रास सुरू झाला असून तिलादेखील रुग्णालयात हलविण्यात यावे, अशी मागणी दक्ष नागरिकांनी महापालिकेकडे केली. परंतु, सोमवारी रात्र झाली तरी तिला घेऊन जाण्यास कोणीही आले नसल्याचे या दक्ष नागरिकांनी सांगितले. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या या चुकीचा फटका आता आणखी किती जणांना बसणार, त्यांच्या संपर्कात आणखी काही नागरिक आले असतील, तर त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.वास्तविक पाहता संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या घरच्यांना तत्काळ क्वारंटाइन करणे अपेक्षित होते. परंतु, महापालिकेने तसे काहीच केलेले नाही. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा काम करीत आहे का? की वाढविण्यासाठी काम करीत आहे, असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थितझाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे