coronavirus : 173 Corona Positive in Kalwa hospital | coronavirus: कळवा रुग्णालयात १७३ जण कोरोनाच्या विळख्यात, कामाचा ताण वाढला

coronavirus: कळवा रुग्णालयात १७३ जण कोरोनाच्या विळख्यात, कामाचा ताण वाढला

ठाणे : ठाण्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १७३ वैद्यकीय व इतर कर्मचारी आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये ५२ महिला कर्मचारी, ४८ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपअधिष्ठातादेखील सुटू शकलेले नसल्याचेही दिसून आले. त्यानंतरही उपलब्ध मनुष्यबळातही रुग्णांना उपचार देण्याचे शर्थीचे प्रयत्न रुग्णालय प्रशासन करत आहे.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय अर्थात कळवा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी रुग्ण दाखल असून वैद्यकीय कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींसह जवळपास ९० टक्के कर्मचारी कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर ताण वाढल्याने त्याचा राग रुग्णांवरही निघत आहे. कळवा रुग्णालय कोविड रुग्णालय नाही, मात्र आयसोलेशन वॉर्डमुळे कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. इतर आजारांच्या रुग्णांनाही येथे उपचार मिळणे कठीण झाले असून शस्त्रक्रियेची व्यवस्थाही बंद आहे. दरम्यान, कळवा रुग्णालयातील ४८ वैद्यकीय अधिकाºयांपैकी ३९ जण बरे झाले असून नऊ जणांवर उपचार सुरू आहेत.

तसेच, ५२ महिला कर्मचाºयांपैकी ३८ जणींवर उपचार सुरू आहेत. १४ महिला बºया झाल्या आहेत. ३४ पैकी १४ पुरुष कर्मचारीही बरे झाले असून २० जणांवर उपचार सुरू आहेत. तर इतर १८ पैकी १७ जण बरे झाले असून त्यातील एकावर उपचार सुरू आहेत. तर मुख्य अधिष्ठताही प्रकृती बरी नसल्याने त्या सुटीवर आहेत.

Web Title: coronavirus : 173 Corona Positive in Kalwa hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.