coronavirus: ठाणे जिल्ह्यात १६३६ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 22:55 IST2021-03-18T22:54:34+5:302021-03-18T22:55:48+5:30
coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ६३६ रुग्ण गुरूवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ८२ हजार ३६८ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३६२ झाली आहे.

coronavirus: ठाणे जिल्ह्यात १६३६ रुग्ण सापडले; सात जणांचा मृत्यू
ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ६३६ रुग्ण गुरूवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ८२ हजार ३६८ रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार ३६२ झाली आहे.
ठाणे शहरात ४२१ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६७ हजार ७ १३२ झाली आहे. शहरात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ४१९ झाली. कल्याण - डोंबिवलीत ५६५ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू आहे. आता ६८ हजार ७३७ रुग्ण बाधीत असून एक हजार २२२ मृत्यूची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये ६१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या १२ हजार ३७४ झाली. तर, ३७३ मृतांची नोंद आहे. भिवंडीला २४ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सात हजार २३ असून मृतांची संख्या ३५६ आहे. मीरा भाईंदरमध्ये ८१ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या २८ हजार २५२ असून मृतांची संख्या ८०८ आहे.
अंबरनाथमध्ये ८२ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत नऊ हजार ३७० असून मृत्यू ३१६ आहेत. बदलापूरमध्ये ८३ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार ८०७ झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२३ कायम आहे. ग्रामीणमध्ये २५ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत २० हजार १६८ झाले असून आतापर्यंत ५९९ मृत्यू नोंदले आहेत.