शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

Corona Vaccine : उल्हासनगरात लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:32 PM

Corona Vaccine: काही खाजगी हॉस्पिटलला लसीकरण करण्यास महापालिकेने परवानगी दिली. मात्र त्यातील लसीकरणाची संख्या अत्यंत कमी आहे.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे कॅम्प नं-५, शाळा क्रं-२८ मधील कोरोना लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळून लांबच लांब रांगा लागत आहेत. ऑनलाईन व टोकन पद्धतीने लसीकरण सुरू असल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली. (Corona Vaccine: Queues of citizens for vaccination in Ulhasnagar, harassment of citizens)

उल्हासनगरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, उपायुक्त मदन सोंडे, वैधकीय अधिकारी डॉ. दिलीप पगारे, डॉ. राजा रिजवानी विविध उपक्रम राबवित आहेत. लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी महापालिकेच्यावतीने आयटीआय कॉलेज इमारत व कॅम्प नं-५ येथील शाळा क्रं-२८ मध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले. दररोज ४०० पेक्षा जास्त जणांचे लसीकरण या केंद्रात होत असल्याची माहिती डॉ. रिजवानी यांनी दिली. 

काही खाजगी हॉस्पिटलला लसीकरण करण्यास महापालिकेने परवानगी दिली. मात्र त्यातील लसीकरणाची संख्या अत्यंत कमी आहे. तर मध्यवर्ती रुग्णालयात लसीकरण सुरू असून रुग्णालयाला राज्य शासनाकडून लसीचा साठा देण्यात येतो. लसीकरण जास्तीत जास्त होण्यासाठी केंद्र वाढविण्याचे संकेत महापालिका आरोग्य विभागाने दिले.  शहर पूर्वेला शाळा क्रं-२८ मध्ये एकमेव लसीकरण केंद्र असल्याने, नागरिक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र आहे.

ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारातून लसीकरण सुरू असून नागरिक सकाळी ६ वाजल्या पासून केंद्रावर रांगा लावत आहेत. नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्रावर नागरिकांना बसण्याची व पिण्याच्या पाणीची कोणतीही सुविधा नसून पेरासिटॉमॉल गोळ्या दिल्या जात नाही. तसेच लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना लसीबाबत प्राथमिक माहिती दिली जात नसल्याने, बहुतांश नागरिक लसी बाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. 

लसीकरण केंद्र नव्हेतर संसर्ग केंद्र?महापालिका लसीकरण केंद्रावरील नागरिकांची गर्दी बघता, हे लसीकरण केंद्र नव्हेतर, कोरोना संसर्ग केंद्र असल्याची टीका मनसे कडून होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळण्यासाठी लसीकरण केंद्र प्रत्येक कॅम्प मध्ये सुरू करण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसulhasnagarउल्हासनगर