शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मरिना बे, साबरमतीचा संगम

By admin | Updated: December 24, 2016 03:12 IST

काही दिवसांपूर्वी रेतीबंदरची खाडी अतिक्रमणमुक्त केल्यानंतर आता पालिका त्या ठिकाणी पारसिक चौपाटी विकसित करणार

ठाणे : काही दिवसांपूर्वी रेतीबंदरची खाडी अतिक्रमणमुक्त केल्यानंतर आता पालिका त्या ठिकाणी पारसिक चौपाटी विकसित करणार आहे. सिंगापूरच्या मरिना बे आणि गुजरातच्या साबरमती नदीचा संगम करून पालिकेने पारसिक चौपाटीचा मास्टर प्लान तयार केला आहे. त्यानुसारच, आता येत्या जून महिन्यापर्यंत प्रत्यक्षात ही चौपाटी आकार घेणार असल्याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या चौपाटीसाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित असून वॉटर फ्रण्ट डेव्हलपमेंटमधील टप्पा क्रमांक-११ हा पारसिक खाडीकिनारा असून तो आता विकसित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेने नुकताच मंजूर केला. त्यानुसार, आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. पहिल्या आर्थिक वर्षात ५ आणि पुढील आर्थिक वर्षात २० कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही जागा महसूलची असून त्यांनी चौपाटी विकसित करण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. आता लेखी मान्यता घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टी विकास प्राधिकरणाकडून मान्यता घेण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून सीआरझेडचे कुठेही उल्लंघन होणार नाही, त्या अनुषंगानेच ही चौपाटी विकसित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला जवळपास सर्वच परवानग्या मिळाल्या आहेत. या प्रकल्पात कोणत्याही अडचणी आल्या नाही, तर आगामी जून महिन्यापर्यंत ही चौपाटी पूर्ण होईल, असे मत महापौर संजय मोरे यांनी या वेळी व्यक्त केले. ती विकसित करण्यासाठी सिंगापूरमधील मरिना बे आणि गुजरातमधील साबरमती येथे विकसित केलेल्या चौपाट्यांचा अभ्यास केला असून त्या दोघांचा संगम करून या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीचा मास्टर प्लान तयार केला आहे. (प्रतिनिधी)