शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
2
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
3
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
4
Mouni Roy : संसार मोडल्यावर मौनी रॉय आणि दिशा पाटनी रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या, व्हायरल पोस्टचं 'सत्य'
5
आयडियाची कल्पना! सूट-बूट घालून विकतोय फ्राईड राईस; दरमहा ७ लाखांची कमाई
6
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा
7
Summer Tips: उन्हाळ्यात लोक टक्कल का करतात? जाणून घ्या त्यामागील आरोग्यदायी फायदे!
8
मुलीचं मौन म्हणजे 'कबूल है-कबूल है-कबूल है...!' अफगाणिस्तानात तालिबानची बालविवाहाला मंजूरी
9
Rahul Gandhi: "शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही?" NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप
10
युद्धातून वाट काढत २०००० टन LPG सह जहाज भारतात! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये IRAN-US ला अशी दिली हुलकावणी
11
निरोपाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार? समोर येतेय अशी अपडेट
12
Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS
13
फ्रान्समध्ये मराठीचा डंका, प्राजक्ता माळीने 'कान्स'मधून शेअर केला व्हिडीओ; तिचा लूक पाहिलात?
14
हनिमूनच्या दिवशीच नवविवाहितेवर लैंगिक अत्याचार; मसाजच्या बहाण्याने ६१ महिलांचे आयुष्य केलं उद्ध्वस्त
15
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
16
संकटं संपता संपेना! ना लस, ना औषध... 'हे' आहे इबोलाचं किलर व्हर्जन; 'या' देशांमध्ये खळबळ
17
"रजनीकांत इतका नीच नाही की...", CM विजय यांच्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना थलायवाने सुनावलं, म्हणाले...
18
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
19
VIDEO: ४१ हजारांचं घड्याळ अन् हातातही घालता येईना; खरेदीसाठी तुफान राडा, बाउन्सर्सनी तरुणांना बदडलं
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारदार बहिणी पोलिसांना चावल्या

By admin | Updated: March 2, 2016 03:18 IST

अर्नाळा पोलीस ठाण्यात पोलिसांशी हुज्जत घालून दोन महिला पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हाताला चावा घेणाऱ्या दोन सख्या बहिणींना अटक करण्यात आली आहे.

वसई : अर्नाळा पोलीस ठाण्यात पोलिसांशी हुज्जत घालून दोन महिला पोलिसांना मारहाण करून त्यांच्या हाताला चावा घेणाऱ्या दोन सख्या बहिणींना अटक करण्यात आली आहे.
प्रज्ञा सिंग आणि गार्गी सिंग अशी आरोपींची नावे आहेत. काल रात्री दोन्ही बहिणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. एका इसमाने यातील एका बहिणीचा विनयभंग केल्याची फिर्यादी त्यांनी दिली होती. याप्रकरणी पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप करीत त्यांनी पोलीस ठाण्यातच धिंंगाणा घातला. त्यावेळी मनीषा अवटी आणि जयंती राजगुरु या महिला पोलीस त्यांची समजूत घालत होते. पण, चवताळलेल्या या दोघी कुणाचेही ऐकून घेत नव्हत्या. आपल्या सांगण्याप्रमाणे तक्रार लिहून घेतलेली नाही. फिर्याद मराठीत का घेतली इंग्रजीत का घेतली नाही, असा आरोप करीत दोघांनी पोलीस ठाणे डोक्यावर घेतले होते. संतापलेल्या दोघींचा संताप अनावर झाला आणि त्यांनी जयंती आणि मनीषा यांनाच मारहाण केली. तसेच त्यांच्या हाताला चावा घेऊन जखमी केले. यानंतर पोलिसांनी प्रज्ञा आणि गार्गी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून रात्री उशिरा अटक केली, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी दिली. तक्रारदार महिलेने महिला पोलिसांला चावा घेण्याची ही पहिलीच घटना आहे.