शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

आ. सरनाईक - आ. मेहतांमधील वाद आणखी चिघळण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 12:13 AM

भाजपाप्रणित कामगार संघटनेचे आंदोलन; परिवहन सेवाही बंद

मीरा रोड : हाटकेशमधील औद्योगिक वसाहतीतील जुन्या कंपन्या तोडण्यावरुन झालेल्या वादात अधिकाऱ्यास मारहाण झाल्याचा दावा करीत भाजपाप्रणित कामगार संघटनेने महापालिकेत मंगळवारी कर्मचाºयांचे कामबंद आंदोलन केले. आमदार प्रताप सरनाईकांचे नाव न घेता, भाजपाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. परिवहन सेवा बंद केल्याने लोकांचे हाल झाले. पालिकेने मात्र कुणालाही मारहाण झाली नसल्याचे सांगून घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना पत्र दिल्याचे स्पष्ट केल्याने भाजपाने आंदोलन मागे घेतले. शिवसेनेच्या संघटनेतील कर्मचारी मात्र कामावर हजर होते.महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी हाटकेश भागातील जुन्या कंपन्यांना शनिवारी सुट्टीच्या दिवशी नोटिशी बजावल्या. शनिवार आणि रविवारची सुट्टी असताना सोमवारी सकाळी ९ वाजतापासूनच पालिकेने येथील बांधकामे तोडण्याची खेळी केली. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना हा प्रकार समजताच त्यांनी शिवसेना नगरसेवक व पदाधिकाºयांसोबत घटनास्थळ गाठून कारवाई थांबवली. त्यामुळे त्यांच्यात आणि आ. मेहता यांच्यात झालेला वाद निवळल्याचे वाटत असतानाच, मंगळवारी सकाळी आ. मेहता अध्यक्ष असलेल्या पालिकेतील श्रमिक जनरल कामगार संघटनेने महापालिकेत कामबंद आंदोलन पुकारले. सकाळी सातच्या सुमारास परिवहन बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे मुर्धा ते उत्तन-चौक, मीरारोडच्या कनकिया, हाटकेश व काशिमीरा भागातील प्रवाशांचे हाल झाले. पालिका कर्मचाºयांनासुध्दा काम बंद करण्याच्या सूचना भाजपाप्रणित संघटनेकडून देण्यात आल्या. त्यामुळे कर्मचाºयांनी बाहेरच ठिय्या दिला. शिवसेनाप्रणित कामगार सेनेच्या अनेक कर्मचाºयांनी मात्र कामावर हजेरी लावली. भाजपाचे सदस्य मुख्यालयात जाणाºया नागरिकांना व कर्मचाºयांना अडवत होते. महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांसमोरच हा प्रकार सुरु होता.दुपारी आ. मेहता यांनी आयुक्तांची भेट घेतली. खेत्रे यांना मारहाण व शिविगाळ करणाºयांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. आयुक्त बालाजी खतगावकर यांनी खेत्रे यांना मारहाण झाली नसून, खेत्रे व उपस्थितांनीदेखील तशीच माहिती दिल्याचे स्पष्ट केले. लोकांना सेवा देण्याचे काम पालिकेचे असून, बंद मागे घ्या, असे आयुक्तांनी सांगितले. त्यानुसार सायंकाळी भाजपाप्रणित कामगार संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतले. परिवहन बससुध्दा सुरु करण्यास सांगण्यात आल्या. आ. मेहतांच्या सांगण्यावरुन विवेक पंडित यांच्या श्रमजिवी संघटनेने साफसफाई व वनविभागाचे काम बंद केले होते. पण मारहाण झाली नसल्याचे व दोन आमदारांतील वाद असल्याचे कळताच पंडित यांनी त्यांच्या सफाई कामगार व वनविभागातील मजुरांना तासाभरातच पुन्हा काम सुरु करण्यास सांगीतले. स्वत: पंडित यांनी यास दुजोरा दिला.शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशाराहाटकेश भागातील औद्योगिक वसाहती तोडण्याच्या मुद्यावरुन भाजपा आणि सेनेच्या आमदारामध्ये सोमवारी जुंपली होती. भविष्यात असा प्रकार झाल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्यामुळे शिवसेना - भाजपाच्या दोन आमदारांमधील वाद चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी हाटकेश भागातील औद्योगिक वसाहतीत कारवाई सुरु केली असता, यावेळी सरनाईक यांनी पालिकेची ही कारवाई हाणून पाडण्याचा प्रयत्न केला.माझ्या मतदारसंघात दुसरा आमदार सांगेल त्यानुसार काम होणार असेल तर ते मी खपवून घेणार नसल्याचा इशाराही सरनाईक यांनी यावेळी दिला होता. त्यानंतर मंगळवारी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. एखाद्या रस्त्याचे रुंदीकरण करायचे झाल्यास ठाणे महापालिका तेथील लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदारास विश्वासात घेते. परंतु मिरा भाईंदरमध्ये विश्वासात न घेता ही कारवाई झाल्याने ते चुकीचे आहे. एका खाजगी विकासकाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यासाठी १९६२ पासूनच्या औद्योगिक क्षेत्रावर कारवाई होणे अयोग्य आहे.येथे आजच्या घडीला १२०० ते १३०० कामगार काम करीत आहेत. असे असताना त्यांना विश्वासात न घेता, औद्योगिक वसाहतीवाल्यांना न सांगता राजकीय दबावापोटी पालिकेने कारवाई करणे चुकीचे आहे. आधी औद्योगिक वसाहतीवाल्यांना विश्वासात घ्या, ते या कामासाठी विरोध करीत नाहीत, परंतु अशी अचानक कारवाई करणे गैर असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात असा प्रकार घडला तर शिवसेना स्टाईलने त्याचे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना