भातसानगर : मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे साठी महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विरोध डावलून त्यांच्या जमिनींचे संपादन सुरू करण्याचे काम सुरू केले आहे. याचा निषेध म्हणून शहापूर तालुक्यात ग्रामीण भागात विजयादशमीच्या रात्री बिरवाडीसह अनेक गावांत शेतकऱ्यांनी महामार्गरूपी रावणाचे दहन करून अनोखे आंदोलन केले. तालुक्यातील धसई, शिलोत्तर, काजगाव, शेलवली या गावांतील शेकडो एकर जमिनी या महामार्ग व स्मार्ट सिटीसाठी संपादित केल्या जाणार आहेत. याविरोधात या गावांमध्ये महामार्गरूपी रावणाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले.विजयादशमीच्या दिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना शहापूर तालुक्यामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाने बाधित होणाऱ्या २७ गावांमध्ये निराशेचे वातावरण होते.
समृद्ध महामार्गाचे अनेक गावांत केले दहन
By admin | Updated: October 13, 2016 03:38 IST
मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे साठी महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विरोध डावलून त्यांच्या जमिनींचे संपादन
समृद्ध महामार्गाचे अनेक गावांत केले दहन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}