शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या निवाऱ्याकरिता मुलाची विनंती

By admin | Updated: March 27, 2017 05:53 IST

तालुक्यातील नढई येथील योगेश दगडू मुकणे हा नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याची आई मंजूळाबाई बेघर

प्रकाश जाधव / मुरबाडतालुक्यातील नढई येथील योगेश दगडू मुकणे हा नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याची आई मंजूळाबाई बेघर झाल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी मुकणे कुटुंबाला इंदिरा आवास योजनेत घर मंजूर झाले होते. मात्र, त्याच वेळी योगेश गंभीर गुन्ह्यात अडकल्याने ते रद्द झाले. मात्र, आता आपल्या आईला पंतप्रधान आवास योजनेतून घर मंजूर करावे, अशी मागणी योगेशने शासनाकडे केली असून मुरबाड पंचायत समितीने योगेशच्या मातृप्रेमाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला आहे.नाशिक कारागृह अधीक्षकांमार्फत शासनाला लिहिलेल्या पत्रात योगेशने आपल्या चुकीमुळे आई व भाऊ बेघर झाल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला असून आपल्या कृत्याची शिक्षा तिला न देता पंतप्रधान आवास योजनेतून आईला घर देण्याची विनंती शासनाला केली. आईला २०१२-१३ या आर्थिक वर्षात इंदिरा आवास योजनेत घर मंजूर झाले. मात्र, मी गुन्ह्यात अडकल्याने ते रद्द झाले. मला जन्मठेप झाल्यानंतर घर बांधू कुणाकरिता, अशी आईची केविलवाणी अवस्था झाली. आमच्या जुन्या झोपडीत ती कष्टप्रद जीवन जगत होती. देखभालीअभावी त्या झोपडीची वाताहत झाल्याने कालांतराने ती झोपडी सोडून मंजूळाबाई वणवण भटकत असल्याचे समजते. योगेशचे हे पत्र मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए. हश्मी यांच्याकडे पोहोचले. आपल्या बेघर आईला निवारा मिळावा, याकरिता तुरुंगात असलेल्या पुत्राची तळमळ पाहून मंजूळाबार्इंना पंतप्रधान आवास योजनेत घर देण्याच्या हालचाली करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. पुत्रविरहाने घर सोडून गेलेल्या या माऊलीचा सध्या शोध घेण्यात येत असून मुकणे कुटुंबाच्या नातलगांकडे जाऊन मंजूळाबार्इंची चौकशी केली जात आहे. योगेश मुकणे हा जरी अपराधी असला आणि तो नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असला, तरी त्याच्या आईला घर देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नव्याने शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. मंजूळाबाई यांना यापूर्वी इंदिरा आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. मात्र, आता योगेशच्या विनंतीवरून आईला घर दिले जाईल.-एस.ई.ए. हश्मी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुरबाड