शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

'अडीच वर्षापूर्वीच निर्णय घेतले असते तर...'; एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला टोला

By अजित मांडके | Updated: July 13, 2022 16:43 IST

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते.

ठाणे: शिवसेनेच्या सर्व खासदारांची हीच भुमिका होती की, राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मु  यांना पांठीबा देणो. आम्ही देखील त्यांना आधीच पाठींबा दिलेला आहे. एका आदीवासी समाजाला मुख्यप्रवाहात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. परंतु उध्दव ठाकरे यांनी जी आता भुमिका घेतली आहे, ती भुमिका ही अडीच वर्षापूर्वीच घेतली असती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला.

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील आनंद आश्रम येथे आले होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा टोला लगावला. सध्या राज्यात राज्यात जे सरकार आहे, ते स्थिर सरकार असून ते योग्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भातील जो प्रस्ताव दिला आहे तो योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला आता कोणत्याही प्रकारचे राजकारण करायचे नसून राज्याचा सर्वागीन विकास हेच आमचे प्रमुख उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची झालेली भेट ही सदीच्छा भेट असल्याचेही त्यांनी सांगितले.

गुरुपौर्णिमेनिमत्त बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन धर्मवीर आनंद दिंघे यांना देखील वंदन केलेले आहे. या दोघांच्या आर्शिवादाने युतीचे सरकार राज्यात स्थापन झालेले आहे, या दोघांची जी शिकवण होती, ती म्हणोज सर्वसामान्यांना न्याय देण्याची होती. या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी, सर्व समाजातील घटक यांना न्याय देण्याचे काम आमचे सरकार करणार आहे. तसेच राज्याचा सर्वागीन विकास, प्रत्येकाला न्याय देण्याचे काम करण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची भुमिका घेतली, त्याला आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी आमच्या भुमिकेला पाठींबा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण राज्यभर जी भुमिका घेतलेली आहे, त्याला राज्यातून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे, प्रत्येकाला वाटले पाहिजे हे आपले सरकार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी आनंद आश्रम येथे उल्हासनगरचे सुमारे १८ नगरसेवक, नाशिक, दिंडोरी आणि नगर येथील शिवसेना नगरसेवकांनी देखील शिंदे यांना समर्थन दिले आहे. किंबहुना त्यांच्या गटात सहभागी झालेले आहेत.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना