स्वस्त धान्याचा काळाबाजार

By Admin | Updated: May 12, 2017 02:16 IST2017-05-12T02:16:30+5:302017-05-12T02:16:30+5:30

स्वस्त धान्याचा काळाबाजार करताना एका वाहतूकदारास कळवा पोलिसांनी बुधवारी खारेगाव टोलनाक्याजवळ अटक केली.

Cheap grained black market | स्वस्त धान्याचा काळाबाजार

स्वस्त धान्याचा काळाबाजार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : स्वस्त धान्याचा काळाबाजार करताना एका वाहतूकदारास कळवा पोलिसांनी बुधवारी खारेगाव टोलनाक्याजवळ अटक केली. आरोपीजवळून ७० हजारांच्या गव्हासह २.७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना शिधापत्रिकेवर पुरवले जाणारे स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश मुगले आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पाळत ठेवली.

Web Title: Cheap grained black market