सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली, क्रेनच्या सहाय्याने बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:56 PM2021-06-09T17:56:34+5:302021-06-09T17:57:09+5:30

बेलवली-कात्रपला जोडणाऱ्या सबवेमधील घटना

The car got stuck in stagnant water in the subway, out with the help of a crane badalapur | सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली, क्रेनच्या सहाय्याने बाहेर

सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकली, क्रेनच्या सहाय्याने बाहेर

Next
ठळक मुद्देसब वेमध्ये जवळपास अर्धा तास ही गाडी चालकासह अडकली होती. अखेर चालकाने मदतीसाठी पाचारण केल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ही गाडी बाहेर ओढून काढण्यात आली.

बदलापूर : सबवेमध्ये साचलेल्या पाण्यात गाडी अडकून पडल्याची घटना बदलापुरात घडली आहे. यानंतर मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी ही गाडी बाहेर काढण्यात आली. बदलापुरात बेलवली आणि कात्रप परिसराला जोडणारा रेल्वे रुळाखालचा सबवे आहे. या सबवेमध्ये दर पावसाळ्यात पाणी साचत असते. आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या सबवेमध्ये गुडघाभरपेक्षा जास्त पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने एका इनोव्हा चालकाने त्यात गाडी टाकली आणि सबवेच्या मधोमध अडकून पडली. 

सब वेमध्ये जवळपास अर्धा तास ही गाडी चालकासह अडकली होती. अखेर चालकाने मदतीसाठी पाचारण केल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ही गाडी बाहेर ओढून काढण्यात आली. या घटनेमुळे बदलापुरातील सबवेत दरवर्षी साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होऊ शकत नसेल, तर किमान पावसाळ्यापुरते तरी हे सबवेच बंद करावेत, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

Web Title: The car got stuck in stagnant water in the subway, out with the help of a crane badalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.